लोक माकडचेष्टा बघायला येतात; नारायण राणेंचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरेंवर निष्ठा यात्रेवरून हल्लाबोल केला आहे.
Narayan Rane
Narayan Ranesaam tv

मुंबई: भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरेंवर निष्ठा यात्रेवरून हल्लाबोल केला आहे. लोक माकडचेष्टा बघायला येतात, असा टोला राणेंनी आदित्य यांना लगावला. यावेळी नारायण राणे यांनी शिवसेना, उद्धव ठाकरे, दसरा मेळावा आणि इतर मुद्द्यांवरूनही लक्ष्य केलं. (Narayan Rane criticises Aditya Thackeray)

Narayan Rane
Vedanta Foxconn: ...मग महाराष्ट्र काय पाकिस्तान होता का? आदित्य ठाकरेंची उपमुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका

शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे निष्ठा यात्रेत शिंदे गटातील आमदारांवर टीकास्त्र सोडत असताना, त्यांच्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. शिवसेना, उद्धव ठाकरे, दसरा मेळावा, धनुष्यबाणाचं चिन्ह कुणाला मिळणार? आदी मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलं. नारायण राणे काय म्हणाले? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळे उपक्रम राबवले आहेत. त्यांचा वाढदिवस असल्याने आम्ही कुठल्याही प्रकारचे राजकारण करणार नाही.

दसरा मेळाव्यासाठी मैदान मिळत नाही. मी पण ३९ वर्षे शिवसेनेत होतो. तेव्हा कुणाची हिंमत होत नव्हती. आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे वाईट दिवस आहेत. दसरा मेळावा हा एकनाथ शिंदेच घेणार. त्यांच्यासोबत आमदार आहेत. मैदान पण त्यांनाच मिळणार असून धनुष्यबाणाचं चिन्हही त्यांनाच मिळणार आहे. त्यांनी हक्क गमावला आहे. त्यांच्या काळात छापले. जनतेला काहीच दिले नाही.

Narayan Rane
फोन केला तेव्हा...'; सुप्रिया सुळेंनी शरद पवारांच्या साताऱ्याच्या पावसातील भाषणाचा किस्सा

कोकणात जाऊन काही उपयोग नाही. कोकण माझ्या शब्दाबाहेर नाही. ते (आदित्य ठाकरे) तेथे गेले, त्यांचा थिल्लरपणा बघायला सगळे आले. मी गेल्यावर माझ्या बाजूने सगळे येतील. त्यांना एकच शब्द सध्या सूचत आहे. तो म्हणजे गद्दारी. त्याच्याबद्दल काय बोलायचं, काही कळतं का त्याला? उद्धव ठाकरे यांची शिवसेना महाराष्ट्रात कधीच सत्तेत येणार नाही. ही माझी ब्रेकिंग न्यूज आहे. लोक माकडचेष्टा बघायला येतात. मी गेल्यावर लोक मला बघायला येतील.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com