भाजप युवा नेत्याचा कारनामा; वाढदिवसानिमित्त तलवारीने कापले 50 केक

पंकजा मुंडे यांचा निकटवर्ती असणाऱ्या भाजप युवा नेत्याचा अनोखा कारनामा
भाजप युवा नेत्याचा कारनामा; वाढदिवसानिमित्त तलवारीने कापले 50 केक
भाजप युवा नेत्याचा कारनामा; वाढदिवसानिमित्त तलवारीने कापले 50 केकविनोद जिरे

बीड - जिल्ह्यात सर्वात जास्त ढगफुटी झालेल्या वडवणीमध्ये, पंकजा मुंडे यांचा निकटवर्ती असणाऱ्या भाजप युवा नेत्याचा अनोखा कारनामा समोर आला आहे. चक्क वाढदिवसानिमित्त, तलवारीने जवळपास 50 केक कापले आहेत. एवढंच नाही तर डीजेच्या तालावर देखील या नेत्याने ठेका धरला.

हे देखील पहा -

बाबरी मुंडे असे त्या भाजप युवा नेत्याचे नाव आहे. बाबरी मुंडे हे वडवणी तालुक्यातील जिल्हा परिषद सर्कलचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य देखील आहेत. तर याच वडवणी तालुक्यात सर्वात जास्त वेळा ढगफुटी होऊन अतिवृष्टीने कहर केला होता. या अतिवृष्टीच्या मदतीसाठी अनेक शेतकरी अद्यापही प्रतीक्षेत असताना दुसरीकडे लोकप्रतिनिधी म्हणून काम करणारे आणि आमदार नगराध्यक्ष होऊ पाहणाऱ्या भाजप युवा नेत्यांनेचे धुमधडाक्यात वाढदिवस साजरे करण्यात येत आहे.

भाजप युवा नेत्याचा कारनामा; वाढदिवसानिमित्त तलवारीने कापले 50 केक
महाराष्ट्र सरकारने ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसला - पंकजा मुंडे

पंकजा मुंडे यांचा निकटवर्ती असणाऱ्या भाजप युवा नेत्याने चक्क तलवारीने जवळपास 50 केक कापल्याने संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आता अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीची मागणी करणाऱ्या भाजप नेत्या पंकजा मुंडे आपल्या युवा नेत्याचे कान टोचणार का आणि पोलीस प्रशासन या नेत्यावर कारवाई करणार का? हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com