रुग्णालयातील असुविधांविरोधात भाजपचे आंदोलन!

रुग्णालयातील असुविधांविरोधात भाजपने आज जोरदार आंदोलन केले आहे. चंद्रपूर महानगर भाजपने या आंदोलनाद्वारे रुग्णालयात डॉक्टरांच्या रिक्त पदांबाबतही आवाज उठवला आहे.
रुग्णालयातील असुविधांविरोधात भाजपचे आंदोलन!
रुग्णालयातील असुविधांविरोधात भाजपचे आंदोलन!SaamTV

चंद्रपूर : चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय Medical College रुग्णालयातील असुविधांविरोधात भाजपने आज जोरदार आंदोलन केले. चंद्रपूर महानगर भाजपने BJPया आंदोलनाद्वारे रुग्णालयात डॉक्टरांच्या रिक्त पदांबाबत आवाज उठवला. या महाविद्यालय रुग्णालयात तज्ञ व ज्युनियर डॉक्टरांची शेकडो पदे रिक्त आहेत ती सर्व पदे भरावी तसेच सर्वसामान्यासांठी सर्व उपचार वेळात व्हावे ते करताना नागरिकांना कोणत्याही अडीअडचणी येवू नयेत अशी भूमिका भाजपाने घेतली आहे. BJP's agitation against hospital inconveniences

हे देखील पहा-

दरम्यान नुकतेच एका अतिदुर्गम भागातून आलेल्या 17 वर्षीय मुलीचा डॉक्टरांअभावी मृत्यू झाला होता. चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्यवस्थापनाने मात्र या आजारी मुलीला उशिराच आणले गेल्याचा दावा केला होता. मात्र कधीही अवेळी जरी एखाद्या व्यक्तीवरती कोणता प्रसंग उद्धभवला तरी त्यांच्यावरती सर्व उपचार वेळेत व्हायला पाहिजेत हिच सर्वसामान्य जनतेची मागणी असते.

रुग्णालयातील असुविधांविरोधात भाजपचे आंदोलन!
काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा समोर ?

दरम्यान अवाढव्य पसरलेल्या औद्योगिक चंद्रपूर जिल्ह्यात मात्र गरीबांच्या सोयीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील या गोंधळाच्या स्थितीवर भाजपने संताप व्यक्त केला आहे तातडीने असुविधा दूर करण्याची मागणी भाजपने या आंदोलनाद्वारे केली आहे.

Edited By-Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com