मुंडे समर्थक नाराज; राजीनाम्याचं लोण अहमदनगरपर्यंत

माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde ) व खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांच्या बरोबर नेहमी अन्याय होत आहे.
मुंडे समर्थक नाराज; राजीनाम्याचं लोण अहमदनगरपर्यंत
सुनीता गोकुळ दौंड यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहेSaam Tv

अहमदनगर: खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांना केंद्रात मंत्रीपद न दिल्याबद्दल अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील भाजपच्या विद्यमान पंचायत समिती सभापती सुनीता गोकुळ दौंड यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. माजी मंत्री पंकजा मुंडे व खासदार प्रीतम मुंडे यांच्या बरोबर नेहमी अन्याय होत आहे.

याचा निषेध आणि माजी मंत्री पंकज मुंडे व खासदार प्रीतम मुंडे यांच्या समर्थनार्थ पाथर्डी पंचायत समिती सभापती सुनीता दौंड तसेच भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ दौंड यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्याकडे दिला आहे. रणजित बेळगे,अर्जुन धायतडक यांनी सुद्धा आपला भाजपा सक्रिय कार्यकारणी सदस्य पदाचे राजीनामे जिल्हाध्यक्ष भाजपा यांच्याकडे दिले आहे.

दरम्यान, खासदार प्रीतम मुंडेंना (MP Pritam Munde) मंत्रीपदापासून डावलल्याने, बीडमध्येही भाजप पदाधिकारी असणारे पंकजा मुंडे समर्थक आक्रमक झाले आहेत. भाजपकडून (BJP) मुंडे भगिनींवर अन्याय केला जात असून जाणीवपूर्वक त्यांना त्रास दिला जात आहे. याचाच निषेध म्हणून आम्ही राजीनामे देत आहोत, असं म्हणत गेल्या 2 दिवसांपासून आतापर्यंत तब्बल 47 जणांनी राजीनामे दिले आहेत.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com