'ते बिचारीला मतदान करा म्हणतील पण तिला...;' भाजपच्या महाडिकांचे महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य (पहा Video)

तर ते काम पत्नीला जमणार आहे का? ज्याचं काम त्यांने करावं...
Dhananjay Mahadik
Dhananjay MahadikSaam TV

कोल्हापूर : भाजपाचे प्रवक्ते, माजी खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी महिलांचा अपमान करणारं एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. 'पती करेल ते पत्नी करू शकेल का? असा सवाल करत ज्याचं काम त्यांनी कराव असं म्हणत त्यांनी महिलांना कमी लेखलं आहे.

सध्या कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीच्या (Kolhapur North By-Election) प्रचार सुरु आहे इथे भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगला आहे मात्र यावेळी भाजपच्या (BJP)नेत्याच्या प्रचारसभेत बोलत असतना माजी खासदार धनंजय महाडिक यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. (BJP's Dhananjay Mahadik's controversial statement about women)

पहा व्हिडीओ -

ते आपल्या भाषणात म्हणाले, 'काँग्रेसवाले (Congress) येतील आणि सांगितील 'आम्ही महिला उमेदवार दिला आहे. ती मात्र बिचारी आहे, महिला म्हणून तिला मतदान करा; मात्र त्यांना विचारा पुरुष करेल ते काम महिला करेल का? पुरुष करु शकणार काम महिला करु शकणार नाही, तुमचा पती जर प्लंबिंगच काम करत असेल तर तुम्हाला ते जमणार आहे? पती इलेक्ट्रीशियन असेल तर त्याच काम पत्नीला जमणार आहे का आणि म्हणून ज्याचं त्यांने काम करावं असं भर सभेत महाडीक म्हणाले आहेत. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्याने स्त्री-पुरुष समानतेचे (Gender equality) गोडवे एकीकडे आपण गात असताना महिलांचा जाहीर अपमान करणं कितपत योग्य आहे असा संतप्त सवाल महिला विचारत आहेत.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com