शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपची 'राणेनीती'

नारायण राणेंची वर्णी मोदी सरकारने केंद्रीय मंत्रीमंडळामध्ये केल्याने महाराष्ट्रात सत्तेवर असलेल्या शिवसेनेला शह देण्यासाठी पूर्ण रणनीती आखली असल्याचे सध्या बोलले जात आहे.
शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपची 'राणेनीती'
शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपची 'राणे'नीती...Saam Tv

मुंबई - शिवसेनेचे कट्टर विरोधक opposition म्हणून प्रसिध्द असणारे तसेच मुख्यमंत्र्यांना chief minister कधीही भिडणारे नेते leader अशी ओळख असणारे भाजपानेते नारायण राणेंची narayan rane वर्णी मोदी सरकारने केंद्रीय मंत्रीमंडळामध्ये केल्याने महाराष्ट्रात सत्तेवर असलेल्या शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपा रणनीती आखत असल्याचे सध्या बोलले जात आहे. BJP's strategy against Shiv Sena

शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपची 'राणे'नीती...
नारायण राणेंचे राऊतांना प्रत्युत्तर; तेव्हा संजय राऊतांना कळेल..

राणे हे मुंबई आणि कोकण मधील अतिशय महत्त्वाचे नेते आहेत. शिवाय मराठा नेते म्हणून नारायण राणे यांची विशेष ओळख आहे. अशाच मुंबई आणि कोकणावर सध्या असलेले शिवसेनेचे वजन कमी करण्यासाठी नारायण राणे यांना थेट केंद्रात मंत्रीपद देण्यात आल्याचं बोललं जातंय. शिवाय ठाण्यामध्ये आणि भिवंडी मध्ये शिवसेनेचा बोलबाला कमी करण्यासाठी कपिल पाटील यांची देखील वर्णी लावली असल्याचं म्हटलं जातंय.

दरम्यान सोमवारी सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये भाजपच्या बारा आमदारांच्या निलंबनामुळे शिवसेना आणि भाजप यांच्यात संबंध आणखीन ताणले गेले. शिवाय दोन दिवसांमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला होता. यातच बुधवारी नारायण राणे यांना थेट केंद्रात मंत्री पद मिळाल्याने शिवसेनेची राजकीय कोंडी करण्याचा चक्रव्यूह सध्या भाजपने आखले असल्याचे समजत आहे

मात्र याचा कोणताही फरक शिवसेनेला पडणार असं मत शिवसेनेचे नेते व्यक्त करत आहेत. शिवाय नारायण राणे यांची वर्णी लागल्यानंतर शिवसेना भवनामध्ये shivsena bhavan मात्र बैठकांचे सत्र जोरात सुरु आहे.

Edited By - Jagdish Patil

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com