Latur : मविआ सरकारविरुद्ध BJYM चे अनोखे आंदोलन; इंधन दरात कपात करण्याची मागणी

BJYM's unique agitation against Mahavikas Aaghadi government in latur : महाराष्ट्र सरकार कर्नाटक राज्याप्रमाणे इंधनाच्या करामध्ये कपात का करत नाही? असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला आहे.
BJYM's unique agitation against Mahavikas Aaghadi government in latur
BJYM's unique agitation against Mahavikas Aaghadi government in laturदीपक क्षीरसागर

लातूर: गुरुवारी लातूर शहरात भारतीय जनता युवा मोर्चाच्या (Bharatiya Janata Yuva Morcha) वतीने अनोखे आंदोलन (Agitation) केले आहे. भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी कुंभकर्णाच्या वेशात महाविकास आघाडी सरकारला दाखवले आहे. महाविकास आघाडी सरकार कुंभकर्णसारखं (Kumbhkarn) झोपेचे सोंग घेत असून इंधन दरात (Fuel Price) कपात केंद्राप्रमाणे कमी केली नसल्याने आंदोलन केले आहे. (BJYM's unique agitation against Mahavikas Aaghadi government in latur; Demand for reduction in fuel prices)

हे देखील पाहा -

केंद्र सरकारने इंधनवरील कर कमी केल्याने सर्वासामान्य माणसाला काही अंशी दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने इंधनवरील करात कपात करून राज्यातील जनतेला दिलासा देणे अपेक्षित आहे. मात्र दोन रुपये आणि दीड रुपये कर कमी करत महाविकास आघाडी सरकारने जनतेची थट्टा केली असल्याचा आरोप केला भारतीय जनता युवा मोर्चाने केला आहे. यामुळे सर्वसामान्य व्यक्तीला काहीच दिलासा मिळाला नाही. शेजारच्या कर्नाटक राज्यात महाराष्ट्रापेक्षा कमी दर आहेत. महाराष्ट्र सरकार कर्नाटक राज्याप्रमाणे इंधनाच्या करामध्ये कपात का करत नाही? असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला आहे.

BJYM's unique agitation against Mahavikas Aaghadi government in latur
Kalyan : कुशिवली धरण मोबदला प्रकरणी त्रिस्तरीय समिती गठीत; चौथा गुन्हा दाखल

आगामी काळात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात महाविकास आघाडी सरकारविरोधात मोर्चे काढण्यात येणार असल्याचा इशारा दिला भाजप युवा मोर्चाच्या नेत्यांनी दिला आहे. शहरातील प्रसिद्ध गांजागोलाई इथल्या देवीला आरती करून या अनोख्या आंदोलनाचा समारोप करण्यात आला. यावेळी प्रेरणा होणाराव, अजित पाटील कव्हेकर यांच्यासाह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com