तरुणाच्या जळत्या चितेवर दिसली काळी कोंबडी, लिंबू अन् बाहुली!

सोलापूर शहरातील पद्मशाली स्मशानभूमीमध्ये तरुणाच्या मृतदेहवार कांही अज्ञात लोकांनी मेलेली काळी कोंबडी, लिंबू,नवीन कपडे आणि बाहुली टाकल्याच धक्कादायक प्रकार आढळून आला आहे.
तरुणाच्या जळत्या चितेवर दिसली काळी कोंबडी, लिंबू अन् बाहुली!
तरुणाच्या जळत्या चितेवर दिसली काळी कोंबडी, लिंबू अन् बाहुली!Saam Tv

विश्वभूषण लिमये

सोलापूर: सोलापूर Solapur शहरातील पद्मशाली स्मशानभूमीमध्ये तरुणाच्या मृतदेहवार कांही अज्ञात लोकांनी मेलेली काळी कोंबडी, लिंबू,नवीन कपडे आणि बाहुली टाकल्याच धक्कादायक प्रकार आढळून आला आहे. मागच्या कांही दिवसांपासून स्मशानभूमीमध्ये अशा घटना वारंवार घडत असल्याचे निदर्शनास येत आहे.

हे देखील पहा-

सतीश कृष्णहरी सामल यांचं मागच्या शुक्रवारी दुपारी निधन झालं होतं. नातेवाईकांनी त्यांच्यावर शनिवारी दुपारी अंत्यसंस्कार केले. त्यानंतरच्या विधीसाठी नातेवाईक अंत्यसंस्काराच्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्या नातेवाईकाच्या चितेवार त्यांना एका पांढऱ्या पिशवीत मेलेली अर्धी जळालेली काळी कोंबडी, नवे कपडे, लिंबू, सुई असे साहित्य दिसून आले.

तरुणाच्या जळत्या चितेवर दिसली काळी कोंबडी, लिंबू अन् बाहुली!
माय नेम इज बाँड.....मुंबई पोलिसांच्या बँडपथकानं वाजवली आगळी धून!

हे पाहून नातेवाईकांना धक्काचं बसला. यामुळे सोलापूर शहरात भानामती, करणीचे प्रकार प्रकर्षाने समोर येताना पहायला मिळतं आहेत.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com