सोलापुरात घरगुती गॅसचा काळाबाजार; आठ जणांना अटक!

8 लाख 41 हजारांचा मुद्देमाल जप्त
सोलापुरात घरगुती गॅसचा काळाबाजार; आठ जणांना अटक!
सोलापुरात घरगुती गॅसचा काळाबाजार; आठ जणांना अटक!विश्वभूषण लिमये

विश्वभूषण लिमये

सोलापूर: घरगुती वापरातील गॅस सिलेंडरचा Domestic Gas Cylinder Black Market काळाबाजार करत बेकायदा रिक्षामध्ये इंधन म्हणून भरत असताना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 8 लाख 41 हजार 226 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हे देखील पहा-

पत्र्याच्या खोलीमध्ये घरगुती वापरातील गॅस टाक्यांचा साठा;

सोलापुरातील प्रभाकर महाराज मठाजवळ जवळकर वस्ती येथील सार्वजनिक शौचालयाच्या बाजूस असलेल्या पत्र्याच्या खोलीमध्ये घरगुती वापरातील गॅस टाक्यांचा साठा करण्यात आला होता. यामुळे इतरांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. घरगुती गॅस सिलिंडरचा विनापरवाना स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गॅस सिलेंडरचा साठा करण्यात आला आहे.

हा गॅस टाक्यांमधून रिक्षा आणि इतर वाहनांमध्ये भरण्यात येत आहे, अशी गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे आणि त्यांच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकून ही कारवाई केली आहे.

सोलापुरात घरगुती गॅसचा काळाबाजार; आठ जणांना अटक!
राष्ट्रवादी कॉग्रेस की कॉग्रेस? भवितव्य भाजपाच्या हाती

आठ आरोपी पोलिसांच्या ताब्यात;

या कारवाईत संघरत्न निजलींगप्पा इंगळे रा.बुधवार पेठ मिलिंद नगर, महेश बाबासाहेब कांबळे (रा. प्रभाकर महाराज मठा) शेजारी आणि लक्ष्मण श्रीमंत पवार यांच्यासह रिक्षाचालक नीलेश भाऊराव गायकवाड , संदीप पांडुरंग तुळसे , नितीन नागनाथ शिरसागर , तुळशीराम बनसिद्ध चवरे आणि अमोल देविदास घुले या आठ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com