राष्ट्रीय महामार्गाला लागणाऱ्या खडी उत्पादनात ब्लास्टिंग; घराना तडे गेल्याने ग्रामस्थांत संताप

महामार्गाचे काम जोमात; गावकरी कोमात
राष्ट्रीय महामार्गाला लागणाऱ्या खडी उत्पादनात ब्लास्टिंग; घराना तडे गेल्याने ग्रामस्थांत संताप
Latur NewsSaam Tv

लातूर - आयुष्यभर काबाडकष्ट करून अनेकजण जगण्यासाठी छोट मोठं घर बांधतात पण आता लातूर (Latur) जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाच्या निर्मितीसाठी खडीचा गरज असल्याने नांदगाव जवळ खदाणी पाडण्यात आल्या आहेत. यातून ब्लास्टिंग करून खडी निर्मितीचे काम केले जात आहे. दरम्यान ब्लास्टिंगच्या आवाजामुळे अनेक घराना मोठमोठे तडे गेल्याने आता संसार उघड्यावर येण्याची शक्यता आहे.

हे देखील पाहा -

देशात राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे लातूर नांदेड (Nanded) राष्ट्रीय महामार्ग निर्मितीचे काम गंगामाई कन्स्ट्रक्शन कंपनीच्या वतीने सुरू असून रस्त्यासाठी खडी निर्मितीचे काम सुरू आहे. यासाठी लातूर नांदेड मार्गावर नांदगाव जवळ मोठ्या खदाणी पाडण्यात आल्या आहेत दिवसरात्र याच खदानीतून ब्लास्टिंग सुरू आहे.

Latur News
धक्कादायक! उल्हासनगर भररस्त्यात एका व्यक्तीवर जीवघेणा हल्ला

यामुळे नांदगाव इथ सर्वच घराना तडे गेले नांदगावातील बहुसंख्य नागरिक शेती,शेतमजुरी करत आहेत. निसर्गाची अवकृपा आणि शेतातील अल्प उत्त्पन्न यामुळे पाई पाई करून पैसे जमवून बांधलेल्या घराना तडे जात असून घर कमकुवत बनत आहेत यामुळं कधी भिंती तर कधी स्लाप पडण्याचा धोका आहे. गावकऱ्यांनी सदरील गंगामाई कन्स्ट्रक्शन कंपनीच्या अधिकारी यांना बोलण्याचा प्रयत्न केला. पण प्रमुख कोण आहे याची माहिती दिली जात नसून नागरिक आता संतप्त झाले आहेत. घराला जात असलेल्या तड्यामुळे होत असलेले नुकसान भरपाई करून द्यावी अशी मागणी आता गावकरी करत आहेत नुकसान भरपाई नाही दिल्यास उग्र आंदोलन करणार असल्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com