'...अन्यथा आमदाराच्या गाडी समोर आंदोलन करू'- बीडमध्ये शिवसंग्राम आक्रमक

बीडमध्ये रस्त्याची मागणी घेऊन शिवसंग्रामचा रस्ता रोको
'...अन्यथा आमदाराच्या गाडी समोर आंदोलन करू'- बीडमध्ये शिवसंग्राम आक्रमक
'...अन्यथा आमदाराच्या गाडी समोर आंदोलन करू'- बीडमध्ये शिवसंग्राम आक्रमकविनोद जिरे

विनोद जिरे

बीड : बीडमध्ये ग्रामीण भागातील रस्त्याची मागणी घेऊन, शिवसंग्राम आक्रमक झाली आहे. बीड- साक्षाळपिंप्री-चकलांबा या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाल्याने 50 ते 60 गावांतील नागरिकांच्या रहदारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे शिवसंग्रामने आज रास्ता रोको आंदोलन केलं आहे.

हे देखील पहा-

दरम्यान, बीड शहराला जोडणाऱ्या जवळपास सर्वच रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. यामुळे भाजीपाला घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांसह दूध घालण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

'...अन्यथा आमदाराच्या गाडी समोर आंदोलन करू'- बीडमध्ये शिवसंग्राम आक्रमक
नागपुरात Cyber Crimeचा उलगडा करण्यात पोलिसांना अपयश?

त्याचबरोबर या रस्त्यावरून येतांना नेहमी अपघात होत आहेत. हात, पाय मोडतोय मात्र प्रशासन किंवा लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देत नाही. त्यामुळं येणाऱ्या आठ दिवसात यावर रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला नाही. तर विद्यमान आमदाराची गाडी अडवून, गाडी समोरच शिवसंग्रामच्या वतीने आम्ही आंदोलन करू. असा इशारा शिवसंग्रामने दिला आहे.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com