पंढरपूर‌ तहसील कार्यालयात रक्तदान शिबीर; 351 रक्तदात्यांनी केले रक्तदान

पंढरपूर येथील तहसीलदार ‌सुशील बेल्हेकर यांनी पुढाकार घेऊन तहसील कार्यालयात रक्तदान शिबीराचे आयोजित केले होते.‌
पंढरपूर‌ तहसील कार्यालयातील रक्तदान शिबिरात
पंढरपूर‌ तहसील कार्यालयातील रक्तदान शिबिरातभारत नागणे

भारत नागणे

पंढरपूर - पंढरपूर Pandharpur येथील तहसीलदार ‌सुशील बेल्हेकर यांनी पुढाकार घेऊन तहसील कार्यालयात रक्तदान शिबीराचे Blood donation आयोजित केले होते.‌ तालुक्यातील 351 रक्तदात्यांनी रक्तदान केले. शासकीय अधिकाऱ्यांच्या‌ रक्तदान आवाहनाला प्रथमच मोठा प्रतिसाद मिळाला. कोरोना Corona विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गेल्या काही महिन्यांपासून सोलापूर Solapur जिल्ह्यात रक्तदाचा तुटवडा निर्माण झाला आहे. Blood donation camp in Pandharpur

हे देखील पहा -

गंभीर आजारातील रुग्णांना तसेच अपघातत जखमी होणाऱ्यांना वेळेत रक्त न मिळाल्यास जिवितास धोका होण्याची शक्यता असते. हीच बाब लक्षात घेवून तहसीलदार ‌सुशील बेल्हेकर यांनी पुढाकार घेऊन रक्तदान शिबीर आयोजित केले.‌

पंढरपूर‌ तहसील कार्यालयातील रक्तदान शिबिरात
पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना निर्बंध कायम

त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत तहसिल व दुय्यम निंबधक कार्यालयातील अधिकारी कर्मचारी , पोलीस पाटील, स्वस्त धान्य दुकानदार, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, तरुण मंडळाचे सदस्य, जेष्ठ आदींनी रक्तदान केले. पालकमंत्री दत्तात्रय भरणे व जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनीही शिबीरास भेट दिली.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com