रोहा मंडळ अधिकारी आणि तलाठी लाच लुचपतच्या जाळ्यात

रोहा तालुक्यातील केळघर या गावात तक्रारदार यांच्या वडिलांची जमीन आहे. तक्रारदार यांच्या वडिलांनी स्वतःच्या मालकीची जमीन तक्रारदार यांना बक्षीस म्हणून दिली आहे.
रोहा मंडळ अधिकारी आणि तलाठी लाच लुचपतच्या जाळ्यात
रोहा मंडळ अधिकारी आणि तलाठी लाच लुचपतच्या जाळ्यात राजेश भोस्तेकर

राजेश भोस्तेकर

रायगड: वडिलांनी मुलाच्या नावे बक्षीसपत्र केलेल्या रजिस्टर बक्षीसपत्राची सातबाऱ्यावर नोंद करण्यासाठी मागितलेल्या अडीच हजार लाचेप्रकरणी रोहा मंडळ अधिकारी आणि तलाठी यांना जेलची हवा खावी लागली आहे. रायगड लाचलुचपत विभागाने ही कारवाई केली आहे. मंडळ अधिकारी राजेश वसंत जाधव, तलाठी महादेव जगन्नाथ मोरे अशी लाचखोर अधिकाऱ्याची नावे आहेत. रोहा मंडळ कार्यालयात तक्रारदार यांच्याकडून लाच स्वीकारताना दोघांना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे.

रोहा तालुक्यातील केळघर या गावात तक्रारदार यांच्या वडिलांची जमीन आहे. तक्रारदार यांच्या वडिलांनी स्वतःच्या मालकीची जमीन तक्रारदार यांना बक्षीस म्हणून दिली आहे. याबाबत वडिलांनी रीतसर रजिस्टर बक्षीस पत्र करून दिले आहे. या रजिस्टर बक्षीस पत्राची नोंद सातबाऱ्यावर करून त्याची प्रत मिळावी यासाठी तक्रारदार यांनी केळघर तलाठी महादेव मोरे याच्याकडे अर्ज केला होता. मात्र सातबाऱ्यावर नोंद करण्यासाठी आणि प्रत देण्यासाठी तीन हजाराची लाच मोरे यांनी तक्रारदार याच्याकडे मागितली. तडजोडीअंती अडीच हजार देण्याचे ठरले.

तक्रारदार यांनी याबाबत अलिबाग येथे रायगड लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली. लाचलुचपत पथकाने तक्रारदार याच्या तक्रारीवरून रोहा मंडळ अधिकारी कार्यालयात सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून तलाठी महादेव मोरे यानी अडीच हजार रुपये लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. मोरे यांनी रोहा मंडळ अधिकारी राजेश जाधव यांच्या संमतीने आणि परवानगीने लाच स्वीकारली असल्याने त्यांनाही अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक किशोर साळे, चालक सहाय्यक फोजदर अरुण घरत, पोह दीपक मोरे, पोना सूरज पाटील, कौस्तुभ मगर यांनी यशस्वी कारवाई केली.

Edited By: Pravin Dhamale

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com