बोगस 'देवमाणूस' ; आदिवासी तरुणीवर केली मेंदूची शस्त्रक्रिया
बोगस 'देवमाणूस' ; आदिवासी तरुणीवर केली मेंदूची शस्त्रक्रियाअभिजित घोरमारे

बोगस 'देवमाणूस' ; आदिवासी तरुणीवर केली मेंदूची शस्त्रक्रिया

एका बोगस डाँक्टरने फक्त दहा हजार रूपयात एका तरूणीची डोक्याची शस्त्रक्रिया केल्याने तरूणीचा मृत्यू झाल्याचा खळबळजनक प्रकार गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील साखरीटोला येथे घडला आहे.

अभिजित घोरमारे

गोंदिया : एका बोगस डॉक्टरने फक्त दहा हजार रूपयात एका तरूणीची डोक्याची शस्त्रक्रिया  केल्याने तरूणीचा मृत्यू  झाल्याचा खळबळजनक प्रकार गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील साखरीटोला येथे घडला आहे. Bogus doctor's brain surgery on a tribal girl

या प्रकारामुळे गोंदिया Gondia जिल्ह्यात सुरू असलेला बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट समोर आला आहे. तरी प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारही कारवाई करण्यात येत नसल्याने मृतक तरूणीच्या कुटुंबियांकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे. मृतक तरूणीचे दमयंती सुरजलाल धुर्वे असे नाव असून समीर राँय असे बोगस डॉक्टरचे नाव आहे.

हे देखील पहा-

साखरीटोला  येथे डॉक्टर समीर रॉय हे डॉक्टरीचा व्यवसाय करत होते. देवरी तालुक्यातील मुरदोली येथील दमयंती सुरजलाल धुर्वे या तरुणीच्या डोक्यावर मागील भागात गाठ होती. त्या गाठीवर डॉक्टर राँय यांनी कोणतीही परवानगी किंवा शस्त्रक्रियाचे कोणतेही ज्ञान नसतांना 10 हजार रुपये घेवून शस्त्रक्रिया केली.

बोगस 'देवमाणूस' ; आदिवासी तरुणीवर केली मेंदूची शस्त्रक्रिया
संतापजनक! 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर नराधमाचा घरामागे अत्याचार

दुसऱ्या दिवशी तरूणीला उलट्या सुरू झाल्या पण गॅसेसची समस्या असेल असे सांगून टाळले गेले. मात्र प्रकृती चिंताजनक झाल्यावर गोंदियातील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. तक्रारीवरून बोगस डाँक्टरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By-Sanika Gade

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com