तेरणा नदी पात्रात आढळला समीरचा मृतदेह; लासोन्यातील रसाळांचा शाेध सुरुच

तेरणा नदी पात्रात आढळला समीरचा मृतदेह; लासोन्यातील रसाळांचा शाेध सुरुच
Sameer Shaikh osmanabad news

- कैलास चाैधरी

उस्मानाबाद : गेले दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील काही भागात अचानक पूरस्थिती निर्माण झाली होती. उस्मानाबाद osmanabad तालुक्यातील बोरखेडा व समुद्रवाणी शिवारातील ओढ्यामधून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. पाण्याच्या वाढत्या प्रवाहात दोघेजण वाहून गेले. शुक्रवारी (ता. 9) रात्री बोरखेडा येथील ओढ्यातून कनगरामधील युवक समीर युनूस शेख वाहून गेला होता. अखेर आज (रविवार) पहाटे सहा वाजता समीरचा मृतदेह तेरणा नदी पात्रात आढळला. (borkheda-youth-body-found-terna-river-marathi-news)

उस्मानाबादच्या जिल्हा आपत्ती निवारण पथक, अग्निशामक दल, जिल्हा पोलिस दल तसेच ग्रामस्थांनी शनिवारी दिवसभर या दोघांचा शोध घेतल मात्र त्यांचा ठावठिकाणा लागत नव्हता. त्यामुळे शोधकार्य थांबवण्यात आले होते. परंतु समीरच्या नातेवाईकांनी त्याचा तपास सुरूच ठेवला.

अखेर आज (रविवार) पहाटे सहाच्या सुमारास समीरचा मृतदेह तेरणा नदी पात्रात आढळला. समीरच्या काकांना सुरुवातीला मृतदेह दिसून आला. तेरणा नदीच्या पात्रात खोलीकरण केलेल्या ठिकाणी मृतदेह अडकून पडला होता. फुगून तो वर आल्यानंतर सर्वांना दिसून आला. दरम्यान लासोना येथील बबन रसाळ हे अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com