दुर्दैवी : पाहुण्यांना घेऊन फिरायला गेला अन् पाण्यात बुडून दोघांचा अंत झाला

समीर याकूब सय्यद हे उजनी धरणात मासेमारीचा व्यावसाय करतात. त्यांच्याकडे आज मुंबईतून चार पाहुणे आले होते. हे सर्वजण सकाळी अकरा वाजता होडीतून फेरफटका मारण्यासाठी धरणाच्या पाण्यात गेले होते
दुर्दैवी : पाहुण्यांना घेऊन फिरायला गेला अन् पाण्यात बुडून दोघांचा अंत झाला
दुर्दैवी : पाहुण्यांना घेऊन फिरायला गेला अन् पाण्यात बुडून दोघांचा अंत झालाभारत नागणे

पंढरपूर : उजनी धरणात होडीतून फिरण्यास गेलेल्या एका मुंबईच्या तरुणासह दोन जणांचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना करमाळा तालुक्यातील चिकलनठाण परिसरात घडली आहे यादुर्घटनेत एका मच्छिमाराचाही समावेश आहे.

समीर याकूब सय्यद हे उजनी धरणात मासेमारीचा व्यावसाय करतात. त्यांच्याकडे आज मुंबईतून चार पाहुणे आले होते. हे सर्वजण सकाळी अकरा वाजता होडीतून फेरफटका मारण्यासाठी उजनी धरणाच्या (Ujani Dam) पाण्यात गेले.

दुर्दैवी : पाहुण्यांना घेऊन फिरायला गेला अन् पाण्यात बुडून दोघांचा अंत झाला
धक्कादायक : कोविडच्या Online प्रमाणपत्रासाठी आशा वर्करला मारहाण

यावेळी मुंबई (Mumbai) येथील अल्ताफ एकबाल शेख वय 18 या युवकाचा तोल गेल्याने पाण्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी समीरने पाण्यात उडी मारली मात्र अल्ताफने मीठी मारल्याने दोघेही पाण्यात बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली ऐन मकरसंक्रांतीच्या (Makar sankrant) सणादिवशी ही घटना घडल्याने गावावर शोककळा पसरली आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com