CCTV Footage: लहानग्याचा स्विमिंगपूलमध्ये बुडून मृत्यू; पुण्याहून रायगडमध्ये फिरायला आलेल्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर

CCTV Footage: संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
Raigad News
Raigad NewsSaam TV

सचिन कदम

Raigad News: एक मन सु्न्न करणारी घटना रायगडमधून समोर आली आहे. पाच वर्षाच्या चिमुरड्याचा स्विमिंग पूलमध्ये पडून बुडून मृत्यू झाला आहे. रायगड जिल्ह्यातील दिवेआगर येथे ही धक्कादायक दुर्घटना घडली आहे. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथे फिरायला आलेल्या पाच वर्षाच्या लहानग्याच्या स्विमिंग पूलमध्ये पडून बुडून मृत्यू झाला आहे. आविष्कार येळवंडे असे या दुर्दैवी मुलाचे नाव आहे. (Latest Marathi News)

Raigad News
Pune Viral Video: भावा यासाठी वाघाचं काळीज लागतं! पुण्यातील महिलांसमोर तरुणानं केली भलतीच डेअरिंग, व्हिडीओ व्हायरल

सावरदारी तालुका खेड जिल्हा पुणे येथील येळवंडे कुटुंबिय दिवेआगर येथे फिरायला आले होते. तेथे हॉटेलच्या समोर असलेल्या स्विमिंग पुलमध्ये ही दुर्घटना घडली. (Pune News)

सीसीटीव्हीतील दृष्यानुसार, अविष्कार स्विमिंग पूलच्या कठड्यावर निवांत बसला होता. बराच वेळ बसल्यानंतर अविष्कार अचानक स्विमिंग पूलमध्ये उतरला आणि तीच चूक त्याच्या जीवावर बेतली.

Raigad News
खरंय! 'एका वाघाची शिकार, एका हरणीने केली'; विश्वास बसत नसेल तर हा Viral Video पाहाच

पाण्याचा अंदाज न आल्याने पूलमध्ये उतरताच पोहता येत नसल्याने तो गटांगळ्या खाऊ लागला. जीव वाचवण्यासाठी त्याने हात-पाय मारले पण तेवढं पुरेसं नव्हतं. अखेर त्याचा बुडून मृत्यू झाला. मन सून्न करणारी ही संपूर्ण घटना हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेरात चित्रित झाली आहे.

मात्र अविष्कार लहान असल्याने पालकांना त्याच्यावर लक्ष ठेवणे गरजेचं होतं. त्यात पोहता येत नसतानाही तो स्विमिंग पूलच्या कठड्यावर बसल्याने पालकांना सावध होत त्याला तिथून दूर केलं पाहिजे होतं. हे सगळे प्रश्न आता आयुष्यभर त्याच्या पालकांना सतावत राहतील.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com