कृष्णाकाठी असणाऱ्या मगरींच्या स्थलांतराला ब्रेक! सांगलीत आढळल्या दहा मगरी

या मगरींचा आकार साधारण सहा फुटांपासून ते तेरा चौदा फुटांपर्यंत आहे.
Sangli News
Sangli Newsविजय पाटील

सांगली : पलूस तालुक्यातील औदुंबर-भिलवडी-चोपडेवाडी नदीकाठी निसर्गप्रेमींना जवळपास दहा लहान मोठ्या मगरींचा अधिवास पहायला मिळाला आहे. या मगरींचा आकार साधारण सहा फुटांपासून ते तेरा चौदा फुटांपर्यंत आहे. यंदा कृष्णानदीची (Krishna River) पाणीपातळी स्थीर असल्याने मगरींच्या स्थलांतराला ब्रेक मिळाला आहे.

गेल्या काही वर्षांत २० जुलै ते १५ ऑगस्ट दरम्यान कृष्णा नदी पात्राबाहेर असल्याने पुरस्थिती असायची. अशा वेळी मगरींचा वावर (Crocodile) ओढे, वगळी शेतांमध्ये पहायला मिळायचा. यंदा मात्र पाणीपातळी स्थीर असल्याने मगरींना आपला अधिवास सोडावा लागलेला दिसत नाही.

कृष्णा नदीत सातत्याने कारखाण्यातील सोडल्या जाणाऱ्या रासायनिक मळीच्या जलप्रदूषणामुळे लाखो मासे मृत होण्याचे प्रकार घडत आहेत. तसेच नदीत इतर मास्यांचे मत्सबीज खाणाऱ्या खिलापीया माशांची संख्या वाढत आहे.

पाहा व्हिडीओ -

अशावेळी नदीतील इतर मासे नष्टप्राय होण्याची भिती निर्माण झालेली आहे. मात्र, या खिलापीया मास्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवणारी मगर ही अत्यंत महत्त्वाची जैव नियंत्रक आहे. म्हणून कृष्णा नदीमध्ये मगरीचे अस्तित्व अत्यंत गरजेचे आहे. तर कृष्णाकाठी ज्या ज्या ठिकाणी गावागावातील गटारगंगा नदीच्या पाण्यात मिसळते त्या त्या ठिकाणी खिलापीया मासे प्रचंड वाढले आहेत ते खाण्यासाठी गेल्या दोन तीन वर्षात मगरींचा पाणवठ्यावर वावर वाढला असल्याने निसर्गप्रेमी संदीप नाझरे यांनी सांगितले.

मगर ही सरहद्द प्रिय वण्यजीव आहे. सहजासहजी ती तिचा नैसर्गिक अधिवास सोडत नाही. महापूरासारख्या नैसर्गिक आपत्तीच्या अपवादात्मक काळात स्थलांतर करत असते. आजूबाजूच्या ओढा वगळीतून स्थलांतर केलेल्या मगरी या पूराचे पाणी ओसरताच परत नदीपात्रात येतात.

Sangli News
Bus Accident: धावत्या बसचे मागचे चाक निखळले; प्रवासी बचावले

यामध्ये ज्या मोठ्या मगरी असतात त्या पाणी ओसरतानाच पात्राकडे परततात. मगर निशाचर असल्याने हा प्रवास रात्रीचा असतो. मात्र यामधील लहान आकाराच्या मगरी या भक्षाच्या शोधात अथवा भक्षाच्या विपुलतेमुळे काही लहानमोठ्या चरी, कॅनॉल, विहरी, ओढ्यामध्ये वास्तव्य करतात. नैसर्गिक गरजेसाठीच नंतर त्या नदीपात्राकडे गेल्याचे आढळले आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com