Breaking! अनिल परबांना इडीची नोटीस

वरचे सरकार कामाला लागले. भुकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता
Breaking! अनिल परबांना इडीची नोटीस
Breaking! अनिल परबांना इडीची नोटीस Saam Tv

''शाब्बास! जन आशीर्वाद जत्रेची सांगता होताच अपेक्षे प्रमाणे अनिल परब यांना ई.डी.ची नोटीस बजावण्यात आली. वरचे सरकार कामाला लागले. भुकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता. परब हे रत्नागिरीचे पालक मंत्री आहेत. chronology कृपया समज लिजीये. कायदेशीर लढाई कायदयानेच लढू..जय महाराष्ट्र,'' असे ट्विट करत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रसरकारवर निशाना साधला आहे.

हे देखील पहा-

शिवसेना नेते आणि रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांना अंमलबजावणी संचलनालयाने नोटीस धाडली आहे. संजय राऊत यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. इतकेच नव्हे तर गेल्या आठवड्यात रत्नागिरीत भाजपाच्या जन आशिर्वाद यात्रेदरम्यान जो काही गदारोळ झाला त्याला अनिल परब यांना कारणीभूत धरण्यात आले होत. अनिल परब यांनी अधिकाऱ्यांवर केंद्रिय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेसाठी दबाव टाकला, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.

आज जनआशिर्वाद यात्रा संपताच त्यांना इडीची नोटीस आल्याने आता शिवसेनेने केंद्र सरकार सुडबुद्धीने ही कारवाई करत असल्याचे म्हटले आहे. परिवहन मंत्री अनिल परब हे रत्नागिरीचे पालक मंत्री आहेत, असे सांगत रत्नागिरीत नारायण राणे यांना अटक केल्यामुळेच ही कारवाई करण्यात येत असल्याचे सूचक विधान राऊत यांनी केले आहे. मात्र, कायदेशीर लढाई कायदयानेच लढू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com