Breaking : नाशिकच्या चर्च मध्ये धर्मगुरूच्या जाचाला कंटाळून फादरने स्वतःला पेटवून घेतले!

या चर्चमधील बिशप (धर्मगुरू) शरद गायकवाड यांच्या जाचाला कंटाळून, फादर अनंत आपटे यांनी स्वतःला पेटवून घेतले.
church
church saamtvnews

-- सागर गायकवाड

नाशिक : नाशिक शहरातील शालिमार येथील सेंट थॉमस चर्च मध्ये फादरने स्वतःला पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. आज रविवारी ऐन प्रार्थनेच्या वेळी घडलेल्या या घटनेमुळे भाविकांची भंबेरी उडाली. या चर्चमधील बिशप (धर्मगुरू) शरद गायकवाड यांच्या जाचाला कंटाळून, गायकवाड ह्यांच्या समोरच फादर आपटे यांनी स्वतःला पेटवून घेतले. गायकवाड यांच्या जाचामुळेच आपण आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे फादर अनंत आपटे यांनी म्हटले आहे.

हे देखील पहा :

शालिमारमध्ये मध्यवर्ती भागात हा सेंट थॉमस चर्च आहे. या चर्चच्या कमिटी सदस्यांमध्ये अनेक विषयांवरून मतभेद आणि वैयक्तिक हेवेदावे आहेत. या कमिटीने फादर अनंत आपटे यांच्यावर फसवणुकीचा आरोप केल्याचे समोर आले आहे. आपल्यावरती झालेल्या आरोपांचे खंडन करण्यासाठी व बाजू स्पष्ट करण्यासाठी फादर आपटे यांनी अनेकदा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे म्हणणे कोणीही ऐकून घेतले नाही. या सर्व प्रतिकूल परिस्थितीमुळे फादर आपटे हे उद्विग्न झाले होते. तसेच ते तणावाखाली होते.

church
वाशिममध्ये तृतीपंथीयांचा राडा; एका तृतीयपंथीस विवस्त्र करून मारहाण!

आज रविवारी उपासनेच्या वेळी देखील त्यांनी धर्मगुरू शरद गायकवाड यांच्याकडे आपले म्हणणे सादर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, गायकवाड यांनी त्यांचे म्हणणे ऐकून न घेतल्याने फादर आपटे यांनी चर्चमध्येच स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. याबाबत आपटे यांनी सांगितले कि माझ्यावर अन्याय झाला आहे. गेल्या दोन वर्षांपासून कमिटीकडून माझा छळ सुरु आहे. माझ्यावर खोट्या लोकांचे ऐकून खोटेनाटे आरोप लावण्यात आले. याबाबत मी वेळोवेळी खुलासा करण्याचा प्रयत्न केला. महागुरू शरद गायकवाड यांच्याकडे माझे म्हणणे मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी माझे म्हणणे ऐकून घेतले नाही.

church
ब्रेकऐवजी ऍक्सीलेटर दाबला; चारचाकी विहिरीत पडून महिलेचा मृत्यू!

आज धर्मगुरू गायकवाड चर्चमध्ये आले असता मी त्यांच्याकडे जाऊन विचारणा केली, म्हणणे मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, गायकवाड यांनी त्याकडे दुर्लक्ष करत, "तुला काय करायचे ते करून घे" असे उत्तर दिले. या छळाला कंटाळूनच मी चर्चमध्ये आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला असून माझे पाय भाजले आहेत. माझी प्रकृती ठीक नाही, अशी माहिती आपटे यांनी दिली आहे.

मात्र, पहिल्यांदाच अशी धक्कादायक घटना चर्च मध्ये घडल्याने खळबळ उडाली आहे. फादर अनंत आपटे यांनी पेटवून घेताच शेजारी प्रार्थना करत असलेल्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ आग विझवली अन्यथा आपटे हे जास्त भाजले गेले असते. या घटनेत फादर आपटे 18 टक्के भाजले गेले आहेत. त्यांच्यावर नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com