Breaking : गगनगिरी महाराजांच्या दर्शनाला निघालेल्या टेम्पोला अपघात; दोन ठार!

या टेम्पोमध्ये २२ भाविक प्रवासी करत होते.
Breaking : गगनगिरी महाराजांच्या दर्शनाला निघालेल्या टेम्पोला अपघात; दोन ठार!
Breaking : गगनगिरी महाराजांच्या दर्शनाला निघालेल्या टेम्पोला अपघात; दोन ठार!दिलीप कांबळे

लोणावळा : देवदर्शनासाठी निघालेल्या टेम्पोला झालेल्या दुर्दैवी अपघातात दोन भाविक ठार झाल्याची घटना लोणावळ्यात जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर घडली आहे. भरधाव वेगात निघालेला टेम्पो क्रमांक -MH 14 GU 922 चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पोची थेट महामार्गावरील संरक्षक कठड्याला जोरदार धडक बसली.

हे देखील पहा :

अपघाताची तीव्रता इतकी होती कि दोघे जण जागीच ठार झाले. तर काही जण किरकोळ आणि गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सोमाटणे फाटा येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या पिकअप टेम्पो मध्ये अंदाजे वीस ते बावीस लोक प्रवास करत होते. हे सर्वजण संगमनेर येथून खालापूर मधील गगनगिरी महाराज यांच्या दर्शनासाठी जात असल्याची माहिती समोर आली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com