
मुंबई : ईडीने आज माजी मंत्री हसन मुश्रीफांची ८ तास चौकशी केली. ईडी चौकशीनंतर मुश्रीफ म्हणाले, आज सव्वाआठ तासांच्या चौकशीत अतिशय योग्य व चांगल्या पद्धतीने उत्तरे देऊन चौकशीला सहकार्य केले आहे. सोमवारी दुपारी १२.३० वाजता पुन्हा बोलविले आहे. त्यावेळीही चौकशीला हजर राहून सहकार्य करू, असे स्पष्टीकरण आमदार हसन मुश्रीफ यांनी दिले आहे.
मुंबई : माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिंदेंना साथ दिली आहे. माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्या शिंदे गटात प्रवेश केल्याने उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे.
महाविकास आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदार-खासदारांना लगावला. मी घरी बसून सरकार चालवलं. घरी बसून मी जे काही करू शकलो, ते सूरत-गुवाहाटीला जाऊन त्यांना जमला नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
कसारा - सरकारने प्रतिनिधी पाठवण्यापेक्षा स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अन्य संबंधित मंत्र्यांनीच आमच्याकडे यावं आणि शेतकऱ्यांसमोरच चर्चा करावी, अशी मागणी लाँग मार्चचे नेतृत्व करणारे जे. पी. गावित यांनी केली.
सरकारचे प्रतिनिधी भेटायला येणार असल्याचं प्रसारमाध्यांद्वारे समजलं. आमच्याशी अजूनपर्यंत थेट संपर्क साधलेला नाही, असे शेतकरी नेत्यांनी सांगितले.
संपाच्या दुसऱ्या दिवशी संपकरी सरकारी कर्मचारी आक्रमक झाल्याचे चित्र रायगडमध्ये दिसले. रायगड जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी आज अलिबागमध्ये शासन निर्णयाची होळी करून सरकारचा निषेध केला. जुनी पेन्शन मिळेपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
छत्रपती संभाजीनगर : जिल्हाधिकारी कार्यालयातील संपात सहभागी झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयासोबत इतर कार्यालयाकडूनही आणि विभागाकडूनही त्या-त्या कर्मचाऱ्यांना नोटिसा देण्याच्या जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांच्या सूचना आहेत. संपामुळे वेगवेगळ्या विभागातील कामे ठप्प झाली आहेत. वैद्यकीय सेवेसोबत अत्यावश्यक सेवेवर परिणाम जाणवू लागला आहे.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीचा आज दुसरा दिवस आहे. कालच्या सुनावणीत शिंदे गटाकडून वकील हरीश साळवे, नीरज किशन कौल, मनिंदर सिंह आणि महेश जेठमलानी यांचे युक्तिवाद पूर्ण झाले. आज तुषार मेहता राज्यपालांची बाजू मांडतील,.
त्यानंतर कपिल सिब्बल ठाकरे गटाच्या वतीनं पुन्हा युक्तिवाद करतील. सिब्बल यांचा युक्तिवाद झाल्यावर सुनावणी संपण्याची शक्यता आहे. दोन्ही बाजूचा युक्तीवाद संपल्यानंतर कोर्ट लवकरच आपला निर्णय जाहीर करणार आहे. त्यामुळे कोर्टाच्या निर्णयाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे.
किसान सभेच्या मोर्चात नवा ट्विस्ट आला आहे. मोर्चाचे शिष्टमंडळ मुंबईत जाणार नाही तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सबंधित मंत्र्यांनी मोर्च्याच्या ठिकाणी यावं, अशी भूमिका जे. पी. गावित यांनी घेतली आहे. सरकार सन्मानाने वागणूक देत नाही, आम्ही चर्चेसाठी जाणार नाही, सामान्य माणूस सरकारला झुकावू शकतो हे दाखवून देणार आहे, असं गावित म्हणाले.
आरोग्य विभागाचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये H3N2चा नागपुरात संशयित बळी गेल्याचे सांगण्यात आले आहे. एका 78 वर्षीय रुग्णाचा H3N2 मुळे मृत्यू झाल्याचं पुढे आले आहे.
आरोग्य विभागाकडून मात्र यासंदर्भात कुठलीही स्पष्टता झालेली नाही. तर H3N2मुळे महाराष्ट्रात अहमदनगरमध्ये पहिला मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. कोरोनासह H3N2 बाधित हा रुग्ण होता. या रुग्णाचे नमुने अधिक तपासणीसाठी पुढे पाठवण्यात आले आहेत. हा रुग्ण एका मेडिकल कॉलेजचा विद्यार्थी असल्याचं समजत आहे.
जुन्या पेन्शनसह विविध मागण्यासांसाठी सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. आज या संपाचा दुसरा दिवस आहे. अशी एकंदरीत स्थिती असताना १८ लाख कर्मचाऱ्यांच्या या संपात फूट पडली आहे. प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य या संघटेनेनं संपातून माघार घेतली आहे. त्यामुळे संपात फूट पडल्याचं दिसून आलंय.
विविध मागण्यांसाठी किसान सभेच्या वतीनं सुरू असलेला मोर्चा मुंबईच्या दिशेने येत आहे. आंदोलकांच्या मागण्यांवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठक घेणार आहेत. या बैठकीत आठ खात्याचे मंत्री आणि अधिकारी उपस्थित असणार आहेत
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.