Breaking News | राजू शेट्टींचं नाव वगळलं नाही : शरद पवार

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भूमिका स्पष्ट करत राज्यपालांना दिलेल्या यादीत कोणताही बदल करण्यात आला नसून राजू शेट्टींचे नाव वगळण्यात आले नसल्याची स्पष्टोक्ती दिली आहे.
Breaking News | राजू शेट्टींचं नाव वगळलं नाही : शरद पवार
Breaking News | राजू शेट्टींचं नाव वगळलं नाही : शरद पवारSaamTv

राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या यादीतून राजू शेट्टी यांचे नाव वगळल्याची चर्चा सकाळापासूनच राज्यभरात सुरु आहे. यावर खुद्द राजू शेट्टी यांनी देखील राष्ट्रवादीचा "करेक्ट कार्यक्रम" करणार असा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचाच डायलॉग म्हणत नाराजीवजा इशारा दिला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांनी देखील राष्ट्रवादीविरोधात सोशल मीडियात संमिश्र प्रतिक्रिया दिल्याचे पाहायला मिळाले.

हे देखील पहा -

परंतु, या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न जयंत पाटील यांनी औरंगाबादमध्ये केला असून, शेट्टींचं नाव या यादीतून वगळले नसल्याची स्पष्टोक्ती देखील दिली आहे. तसेच राजू शेट्टी हे जरी करेक्ट कार्यक्रम कार्यक्रम करणार म्हणत असतील, तर ते वाक्य राष्ट्रवादीसाठीच आहे हे कशावरून असा सवालही त्यांनी केला आहे.

Breaking News | राजू शेट्टींचं नाव वगळलं नाही : शरद पवार
Breaking Akola : बालिकेला रक्तातून HIV ची बाधा; ब्लड बँकेला ठोकले टाळे!

दरम्यान, याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भूमिका स्पष्ट करत राज्यपालांना दिलेल्या यादीत कोणताही बदल करण्यात आला नसून राजू शेट्टींचे नाव वगळण्यात आले नसल्याची स्पष्टोक्ती दिली आहे. राजू शेट्टी यांचे शेती व सहकार क्षेत्रातील काम मोठे असून त्याआधारेच त्यांच्या नावाची शिफारस विधानपरिषदेसाठी करण्यात आली असून, आम्ही आमचा दिलेला शब्द प्रामाणिकपणे पाळला आहे. त्यामुळे राज्यपाल शेट्टींच्या नावाचा विचार करतील असे विधान देखील पवारांनी केले आहे. शेट्टींच्या नाराजीवर मात्र पवारांनी भाष्य करणे टाळले आहे.

By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com