
Dapoli Sai Resort Case : गेल्या काही दिवसांपासून राज्यात चर्चेत असलेल्या साई रिसॉर्ट प्रकरणातील (Sai Resort case) एक याचिका भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी मागे घेतली आहे. या प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरु असताना सोमय्या यांनी याचिका मागे घेतल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena UBT) गटाचे नेते आमादर अनिल परब यांच्याशी संबंधित हे साई रिसॉर्ट प्रकरण आहे. गेल्या काही वर्षांपासून हे प्रकरण चांगलंच गाजत आहे. साई रिसॉर्टच्या मुद्द्यावरुन किरीट सोमय्या यांनी अनिल परब ( Anil parab) यांना घेरलेलं आहे. या प्रकरणात ईडीकडूही चौकशी सुरू आहे.
दरम्यान आज किरीट सोमय्या यांनी अचानक साई रिसॉर्ट प्रकरणातील एक याचिका मागे घेतली आहे. हायकोर्टात प्रकरण प्रलंबित असल्याने सोमय्यांनी याचिका मागे घेतल्याचे सांगण्यात येत आहे. (Breaking News)
नेमकं काय आहे प्रकरण
समुद्र किनारपट्टी नियमन अधिनियमाचं उल्लंघन केल्याप्रकरणी किरीट सोमय्यांनी हरित लवादामध्ये याचिका दाखल केलेली होती. अनिल परब आणि सदानंद कदम यांच्याविरोधात राष्ट्रीय हरित लवादामध्ये याचिका दाखल होती. मात्र आज ती मागे घेण्यात आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार हायकोर्ट आणि ईडीकडून या प्रकरणावरील कारवाई सुरूच राहणार आहे. (Latest Political News)
आरोपपत्रात अनिल परब यांचं नाव नाही
ईडीच्या आरोपपत्रात जरी अनिल परब यांचं नाव आरोपी म्हणून नसलं तरी या प्रकरणात त्यांच्या नावाचा वारंवार उल्लेख करण्यात येत आहे. दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणाचा तपास अजुनही सुरू आहे. या प्रकरणात जयराम देशपांडे आणि सदानंद कदम हे ईडीच्या अटकेत आहेत. दुसरीकडे सुधीर शांताराम परदुले, विनोद दिपोलकर, सुरेश तुपे, अनंत कोळी यांच्या नावाचाही ईडीच्या आरोपपत्रात समावेश करण्यात आला आहे. (Latest Marathi News)
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.