Breaking : पैसे दिले नाही म्हणून तृतीय पंथीनी केली एकाची हत्या!

चार तृतीयपंथी आरोपींनी त्यांच्या इतर साथीदारांच्या मदतीने एका व्यक्तीला गावात जाऊन लाकडी दांडक्याने जबर मारहाण करून हत्या केल्याची घटना अहमदनगर मधील श्रीरामपूर तालुक्यात घडली आहे.
Breaking : पैसे दिले नाही म्हणून तृतीय पंथीनी केली एकाची हत्या!
Breaking : पैसे दिले नाही म्हणून तृतीय पंथीनी केली एकाची हत्या!गोविंद साळुंके

गोविंद साळुंके

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर-राहाता तालुक्यातील एकरुखे गावात राहणारे दिलीप आभाळे हे काल (दि.१६) त्यांच्या नंदू क्षीरसागर नावाच्या मित्रासोबत गणेशनगर येथे पेट्रोल भरण्यासाठी जात असताना गणेशनगर फाट्याजवळ काही तृतीयपंथींनी त्यांच्याकडे पैशाची मागणी केली.

हे देखील पहा :

त्यावेळी झालेल्या वादात चार तृतीयपंथी आरोपींनी त्यांच्या इतर साथीदारांच्या मदतीने दिलीप आभाळे यांना त्यांच्या एकरुखे गावात जाऊन लाकडी दांडक्याने जबर मारहाण करून हत्या केल्याची घटना घडली असून पोलिसांनी बारा तासात 8 आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. पैसे दिले नाही याचा राग मनात धरून तृतीय पंथीयांनी इतर साथीदारांना बोलावून दिलीप आभाळे यांना लाकडी दांड्याने जबर मारहाण केल्याने ते गंभीररीत्या जखमी झाले होते.

Breaking : पैसे दिले नाही म्हणून तृतीय पंथीनी केली एकाची हत्या!
Narendra Modi : ७ वर्षात एकही पत्रकार परिषद न घेण्याचा मोदीजींचा गुण सर्वात जास्त आवडतो : प्रीतम मुंडे
Breaking : पैसे दिले नाही म्हणून तृतीय पंथीनी केली एकाची हत्या!
कल्याण-मलंग रोडवर पहाटेच्या सुमारास जिवंत अर्भक ठेवून जाणारी महिला CCTV मध्ये कैद!

रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे मयताच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून राहाता पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून. पोलिसांनी तात्काळ वेगवेगळी पथके नेमून गुन्ह्यातील आठ आरोपींना बारा तासाच्या आत वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक केली आहे. या प्रकरणात आणखी किती आरोपी आहेत, याचा शोध पोलीस घेत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com