Breaking : Sakinaka Rape Case : ऍट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल

आज मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी पत्रकार परिषद घेऊन गुन्ह्याच्या तपासासंदर्भात व तपासाच्या दिशेसंदर्भात माहिती दिली. पीडित महिला विशिष्ट समाजातील असल्याने बलात्काराच्या व हत्येच्या कलमांसह ऍट्रॉसिटी कायद्यान्वये देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Breaking : Sakinaka Rape Case : ऍट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल
Breaking Sakinaka Rape Case : पंधरा दिवसात तपास होणार पूर्णSaamTvNews

मुंबई : साकीनाका बलात्कार प्रकरणाने राज्यासह संपूर्ण देश हादरला आहे. दिल्लीच्या निर्भया केसची पुनरावृत्ती मुंबई मध्ये झाली आहे. आज मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी पत्रकार परिषद घेऊन गुन्ह्याच्या तपासासंदर्भात व तपासाच्या दिशेसंदर्भात माहिती दिली. पीडित महिला विशिष्ट समाजातील असल्याने बलात्काराच्या व हत्येच्या कलमांसह ऍट्रॉसिटी कायद्यान्वये देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील पहा :

'तो' लोखंडी रॉड जप्त...

आरोपीला अटक करण्यात आली असून आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. सदर क्रूर गुन्ह्यात वापरण्यात आलेला लोखंडी रॉड देखील पोलिसांनी जप्त केला असल्याची माहिती नगराळे यांनी दिली. घटनास्थळावर आरोपी कसा आला, पीडित महिला कशी आली, घटनस्थळावरून गुन्हा करून तो कसा गेला आणि एकूणच आणि गुन्ह्याचा घटनाक्रम यासंदर्भातील शृंखलेचा पूर्ण तपशील समजल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

विशेष वकिलाची नेमणूक...

या गुन्ह्यातील तपासासाठी व मार्गदर्शनासाठी ऍड.राजा ठाकरे यांची विशेष वकील म्हणून नेमणूक कऱण्यात आली असून ते पुढील तपासात मार्गदर्शन करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Breaking Sakinaka Rape Case : पंधरा दिवसात तपास होणार पूर्ण
Breaking |झोपलेल्या चिमुकलीच्या गळ्याला नागाने वेटोळा घातलेला हा VIDEO पहाच
Breaking Sakinaka Rape Case : पंधरा दिवसात तपास होणार पूर्ण
Breaking Nashik | नाशिकमध्ये महिलेची दुचाकी अडवत, कारमध्ये नेऊन बलात्कार!

१५ दिवसांत तपास होणार पूर्ण...

सदर गुन्ह्यात एक महिन्याच्या आत दोषारोप पत्र दाखल करण्यात येणार असून १५ दिवसांच्या आत संपूर्ण गुन्ह्याचा उलघडा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली असून आरोपीला जलदरीत्या अटक केल्याबद्दल व सदर गुन्ह्यात तातडीने कारवाई केल्याबद्दल केंद्रीय महिला आयोग, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडून पोलिसांचे कौतुक करण्यात आल्याचेही ते म्हणाले.

पीडितेच्या मुलींसाठी विशेष आर्थिक सहाय्य...

साकीनाका बलात्कार प्रकरणातील पीडितेची अत्यंत अमानुषपणे आणि क्रूरतापुर्वक अत्याचार करून हत्या कऱण्यात आली आहे. पीडितेच्या मुली पोरक्या झाल्या असून सरकारकडून पीडितेच्या कुटुंबियांसाठी अथवा मुलींसाठी वीस लाख रुपयांची विशेष मदत मुख्यमंत्र्यांकडून जाहीर करण्यात आली आहे. सगळा तपास आणि प्रक्रिया पूर्ण झाल्या नंतर ही मदत दिली जाणार आहे. तसेच विविध शासकीय योजनांमधून जास्तीत जास्त मदत शासन करणार असल्याची माहिती नगराळे यांनी दिली.

By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com