दोन तालुक्यातील जोडणारा पूल पाण्याखाली; वाहतूक ठप्प

नागरिकांचे दळण- वळण धोक्यात
दोन तालुक्यातील जोडणारा पूल पाण्याखाली; वाहतूक ठप्प
दोन तालुक्यातील जोडणारा पूल पाण्याखाली; वाहतूक ठप्प विश्वभूषण लिमये

सोलापूर : सोलापूर Solapur जिल्ह्यातील श्रीपतपिंपरी Sripatpimpari गावाच्या अलिकडे असणाऱ्या, बार्शी Barshi अन् माढा Madha तालुक्याला जोडणाऱ्या ओढ्याच्या पुलावरुन bridge मागील पंधरा दिवसांपासून पाणी वाहत असल्याने ग्रामस्थ Villager प्रवाशांचे पुलावरील पाण्यातून दळण- वळण सुरु आहे. पुलाला कठडे अथवा अँगलचे गार्ड नसल्याने, जीव मुठीत घेऊन सर्वजण जाताना दिसत आहेत. पुलाची उंची वाढवावी अशी मागणी ग्रामस्थांची आहे.

हे देखील पहा-

बार्शी तालुक्यातील कुसळंब, घोर ओढा, कासारवाडी, कोरफळे, अलिपूर, खांडवी Khandvi या ठिकाणी लहान- मोठ्या ओढ्यातून पाणी श्रीपतपिंपरी या ठिकाणी असलेल्या ओढ्याला येत असल्याने वर्षातील आठ महिने वाहत असतो. सोलापूर जिल्हा परिषदेच्या ZP अखत्यारित या ओढ्याचे काम झाले आहे. दोन वर्षापूर्वी डागडूजी करण्यात आली होती. पण ओढ्याची उंची मात्र, वाढवण्यात आली नाही.

दोन तालुक्यातील जोडणारा पूल पाण्याखाली; वाहतूक ठप्प
कसणी गावाजवळील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प

बार्शी तालुक्यात मोठा पाऊस झाला की ओढ्यावरुन पाणी वाहणे सूरू होते. 31 मे पासून ओढ्यात मुबलक पाणी येत आहे. अन् ओढा वाहत आहे. दरम्यान पाणी वाहत असल्यामुळे ओढ्याच्या दोन्ही कडेच्या बाजूला शेवाळे झाले असून, चालत अथवा दुचाकी जात असताना घसरुन पडण्याच्या अनेक घटना घडत आहेत. तर मागील वर्षी एक जणाचा वाहून जाऊन मृत्यू झाला होता.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com