नात्याला काळीमा! सख्ख्या भावाने बहिणीचे केले लैंगिक शोषण, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

वर्ध्यात नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे.
sexual assault crime
sexual assault crimesaam tv

वर्धा : बहिण-भावाचं नातं हे पवित्र बंधन असतं. रक्षाबंधन म्हणजे बहिण-भावाच्या प्रेमाचं बंधन असतं. माझा भाऊ नेहमीच माझं रक्षण करील, असा विश्वास प्रत्येक (Brother-Sister Relationship) बहिणीचा भावावर असतो. पण वर्ध्यात नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका नराधम सख्ख्या भावाने बहिणीचं लैंगिक शोषण (Sexual Assault) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित अल्पवयीन मुलीचे पोट दुखत असल्याने तिला सेवाग्राम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यावेळी पीडित मुलगी सहा महिन्यांची गर्भवती असल्याचे उघड झाले. नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेचा तीव्र निषेध केला जात आहे. ही धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर पीडितेच्या कुटुंबियांनी आरोपी विरोधात पोलीस स्टेशनमध्ये (Police Station) तक्रार दाखल केली. त्यानंतर शहर पोलीस ठाण्यातील (Pocso Act) पोक्सो विभागाने आरोपीला ताब्यात घेतले आहे.

sexual assault crime
Ajit Pawar: राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा; विरोधी पक्षनेते अजित पवार

मिळालेल्या माहितीनुसार, आई-वडिल कामानिमित्त घराबाहेर गेले असताना एका नराधम भावाने घरात असलेल्या बहिणीचे लैंगिक शोषण केले. बहिण-भावाच्या पवित्र नात्याला काळीमा फासण्याचं कृत्य नराधम भावाने केले आहे. पीडित मुलीच्या पोटात दुखत असल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

sexual assault crime
Mumbai Crime : मोबाईल चोरट्यांच्या मोठ्या टोळीला पोलिसांकडून अटक; १७ लाखांपेक्षा जास्त मुद्देमाल जप्त

त्यावेळी ती गर्भवती असल्याचे उघड झाले. या घटना पीडितेच्या कुटुंबीयांना समजताच त्यांना मानसिक धक्का बसला. पीडितेच्या कुटुंबीयांनी आरोपी विरोधात तक्रार दाखल केली. दरम्यान, सखी वन स्टॉप सेंटरच्या केंद्र प्रशासकांनी पीडित मुलीचे समुपदेशन केले. त्यानंतर घडलेला सर्व प्रकार पीडितेने पोलिसांना सांगितला. त्यानंतर आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले.

Edited By - Naresh Shende

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com