
अहमदनगर : जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. शेततळ्यावर कपडे धुण्यासाठी (water drowning) गेलेल्या भावंडांचा पाण्यात बुडून (Brother-sister death) मृत्यू झाला आहे. बहिणीसोबत आलेल्या 7 वर्षांच्या भावाचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही दुर्देवी घटना संगमनेर (sangamner) तालुक्यातील मोधळवाडीच्या घाणेवस्तीत घडली आहे. जयश्री बबन शिंदे (२१) आणि आयुष बबन शिंदे (७) अशी मृतांची नावं आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव देपा गावांतर्गत असलेल्या मोधळवाडीतील घाणेवस्तीत बबन चांगदेव शिंदे आपल्या कुटुंबासोबत राहतात. मुलगी जयश्री व मुलगा आयुष हे दोघे बहीण-भाऊ कपडे धुण्यासाठी शेततळ्यावर गेले होते.आयुष हा शेततळ्यातून पाणी काढत असताना त्याचा पाय घसरला आणि तो शेततळ्यात पडला.भाऊ शेततळ्यात पडला त्यामुळे त्याला वाचवण्यासाठी बहीण जयश्री हिने शेततळ्यात उडी मारली. मात्र दोघेही शेततळ्यातील खोल पाण्यात जाऊन बुडाले. सदर घटनेची माहिती नागरिकांना मिळताच दोन्ही मुलांचे मृतदेह पाण्यातून काढण्यात आले.
Edited By- Naresh Shende
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.