धुळ्यात ब्राऊन शुगर सापडल्याने खळबळ; आय जी पथक आणि मोहाडी पोलिसांची कारवाई

रेसिडेन्सी पार्क हॉटेल जवळ कारवाई करत एकाला घेतले ताब्यात
धुळ्यात ब्राऊन शुगर सापडल्याने खळबळ; आय जी पथक आणि मोहाडी पोलिसांची कारवाई
धुळ्यात ब्राऊन शुगर सापडल्याने खळबळ; आय जी पथक आणि मोहाडी पोलिसांची कारवाई भूषण अहिरे

धुळे : एकीकडे ड्रग्स प्रकरणावरुन बॉलीवूड कनेक्शन समोर आल्यानंतर सर्वत्रच मोठी खळबळ उडाली आहे. काल रात्री धुळ्यात देखील जवळपास अर्धा किलो ब्राऊन शुगर नाशिकच्या आय जी पथकासह धुळे मोहाडी पोलिसांनी पकडले आहे. नाशिक येथील आयजी पथकाला गुप्तगार मार्फत माहिती मिळाली होती.

हे देखील पहा-

जळगाव जिल्ह्यातुन एक इसम धुळ्यातील मोहाडी पोलिस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या हॉटेल रेसिडेन्सी पार्क याठिकाणी आपल्या सोबत ब्राऊन शुगर विक्रीच्या हेतूने घेऊन येत आहे. या माहितीच्या आधारे आय जी ची पथक आणि मोहाडी पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई करण्यात आली आहे.

धुळ्यात ब्राऊन शुगर सापडल्याने खळबळ; आय जी पथक आणि मोहाडी पोलिसांची कारवाई
विवाहित महिलेचे अश्लील व्हिडिओ काढून ब्लॅकमेल, तरुणाला बेदम चोप

हॉटेल रेसिडेन्सी पार्क याठिकाणी ब्राऊनशुगर बाळगून असलेल्या व्यक्तीचे रात्रीच मुसक्या आवळल्या आहेत. या इसमाकडून जवळपास अर्धा किलो ब्राऊन शुगर पोलिसांनी जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा मुंबई ड्रग्स प्रकरणाशी काही संबंध आहे का? याचा देखील तपास आता मोहाडी पोलिस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.