पुसद मध्ये पूर्ववैमनस्यातून युवकाची निर्घुण हत्या!

मृत तरुणाच्या पाठीवर 7 ते 8 घाव मारल्याचे दिसत आहे.
पुसद मध्ये पूर्ववैमनस्यातून युवकाची निर्घुण हत्या!
पुसद मध्ये पूर्ववैमनस्यातून युवकाची निर्घुण हत्या!Saam Tv

संजय राठोड

यवतमाळ : पुसद शहर (Pusad City) एकदा पुन्हा तरुणाच्या हत्येने (Murder) हादरले आहे, पुसद उपजिल्हा रुग्णालयाच्या कमानी समोरिल रोडच्या कडेला मंगळवारी रात्रीच्या दरम्यान एका युवकाची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मनोज सवंगडे (Manoj Sawangade) असे मृत तरूणाचे नाव आहे. शहरातील सरकारी दवाखान्याच्या कमानी जवळच्या रोडवर तरुणाची हत्या झाली आहे. मनोज सवंगडे वय अंदाजे 22 वर्ष रा. भीमनगर श्रीरामपूर (Srirampur) पुसद असे मृतकाचे नाव आहे. ही हत्या पूर्ववैमनस्यातून झाली असल्याची माहिती समोर येत आहे. (Brutal murder of a youth)

हे देखील पहा-

या मृत तरुणाच्या पाठीवर 7 ते 8 घाव मारल्याचे दिसत आहे. तसेच या तरुणाला 10 जणांनी मारल्याचे पोलिसांनी सांगितले. सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. या घटनेचा तपास पुसद शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार दिनेशचंद्र शुक्ला आणि त्यांची टीम करत असून या घटनेने सर्व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पुसद मध्ये पूर्ववैमनस्यातून युवकाची निर्घुण हत्या!
धक्कादायक! जेवण देत नसल्याच्या रागातून मुलाने केला वडिलांचा खून

दरम्यान अशा प्रकारच्या हत्या दिवसेंदिवस वाढत आहे हल्ले खोरांना आणि शहरातील गुंडांना पोलिसांची भिती आहे की नाही हा प्रश्न उपस्थित होत आहे.

Edited By - Jagdish Patil

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com