धक्कादायक! हिंगोलीच्या BSF जवानाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

हिंगोलीत एक धक्कादायक घटना समोर आली
धक्कादायक! हिंगोलीच्या BSF जवानाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या
धक्कादायक! हिंगोलीच्या BSF जवानाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या Saam Tv

हिंगोली : हिंगोलीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हिंगोली गावातील अरुण सखाराम कवाने हे गुजरातमध्ये भुज मुंद्रा या ठिकाणी बीएसएफ बटालियन १८ मध्ये हेड कॉन्स्टेबल पदावर कार्यरत होते. त्यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची दुःखद घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. पोलीस यासंबंधी अधिक तपास करत आहेत.

हे देखील पहा-

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील आदर्श कॉलेज जवळील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या निधनामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त होत आहे. अरुण कवाणे यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले असा परिवार आहे.

धक्कादायक! हिंगोलीच्या BSF जवानाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या
देशात प्रथमच पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या वाढली; प्रजनन दर कमी झाला

१९९९ मध्ये त्यांनी बीएसएफ फोर्स जॉईन केले होते. शहरामधील संमती नगर या ठिकाणी त्यांचे कुटुंब वास्तव्यास होते. रात्री त्यांच्या कुटुंबियांच्या त्यांचे पार्थिव देण्यात आले होते. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून अरुण यांनी आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल का उचलले? याविषयी पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com