Beed: बुवासाहेब खाडे महाराज वादाच्या भोवऱ्यात; महिलेच्या फिर्यादीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल

बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
Kharda Police Station
Kharda Police StationSaam Tv

बीड - पाटोदा तालुक्यातील सावरगाव येथील श्री क्षेत्र हनुमानगडचे मठाधिपती, बुवासाहेब खाडे महाराज हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांच्याविरुद्ध अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा पोलीस ठाण्यात, एका 29 वर्षीय महिलेने बलात्कार केल्याची तक्रार दिली आहे. तर त्याआधी मठाधिपतींनीही मारहाण करून धमकावल्याप्रकरणी 5 जणांवर गुन्हा नोंदविला होता. यामुळं बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

हनुमानगडाचे मठाधिपती बुवासाहेब जिजाबा खाडे वय 56 यांनी, खर्डा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून, 29 जुलै रोजी ते जामखेड तालुक्यातील मोहरी येथे महादेवाच्या मंदिराचे काम पाहण्यासाठी गेले होते. यावेळी बाजीराव गित्ते, अरुण गिते, भिवा गोपाळघरे, राहुल गिते व रामा गिते यांनी मठाधिपती खाडे यांना घुगे वस्तीवरील बाजीराव गिते यांच्या घरात बोलावून घेतले.

हे देखील पाहा -

पहाटे 1:30 च्या दरम्यान राहुल गिते याने, मोबाइलमधील फोटो दाखवून दमदाटी करत त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी त्याने दोरी दाखवून फाशी देण्याची धमकी दिली आणि पहाटे 5:30 वाजता तो कोयता घेऊन अंगावर धावला. या दरम्यान जीवे मारण्याची धमकी देत सोन्याची चेन, अंगठ्या, मणी असा 13 लाख 60 हजार रुपयांचा ऐवज काढून घेतला. अशा स्वरूपाच्या फिर्यादीवरून, खर्डा पोलीस ठाण्यात 5 जणांवर 3 ऑगस्ट रोजी गुन्हा नोंद झाला आहे.

Kharda Police Station
Beed: 120 बाेगस शिक्षकांना केलं जाणार कार्यमुक्त; पगारही वसूल हाेणार

त्यानंतर 4 ऑगस्ट रोजी मोहरी येथील एका 29 वर्षीय महिलेने, रात्री 9:15 च्या दरम्यान, खर्डा पोलीस ठाण्यात तक्रार दिलीय. या दिलेल्या तक्रारीवरून , जून ते 12 जुलै 2022 दरम्यान मठाधिपती बुवासाहेब जिजाबा खाडे यांनी, सोन्याचे दागिने व लग्न करण्याचे आमिष दाखवून वेळोवेळी बळजबरीने लैंगिक अत्याचार केला. यावरून मठाधिपती बुवासाहेब खाडे यांच्यावर खर्डा पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेने पाटोदा तालुक्यासह जिल्ह्यात एकचं खळबळ उडाली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com