Sudhir Mungantiwar Praised Budget : 'खुर्चीप्रिय नाही तर राष्ट्रप्रिय अर्थसंकल्प', सुधीर मुनगंटीवारांसह भाजपकडून भरभरून कौतुक

Budget Reaction : अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांना प्राधान्य दिलं आहे अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.
BJP leaders including Sudhir Mungantiwar praised the budget
BJP leaders including Sudhir Mungantiwar praised the budgetsaam tv

Sudhir Mungantiwar On Budget : आज देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. यावर मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. करामध्ये कपात करणे आणि करदात्याला दिलासा देणं एव्हढ्यापुरत अर्थसंकल्पकडे बघू नये असे मुनगंटीवार म्हणाले. अर्थसंकल्प खुर्चीप्रिय असू नये तर राष्ट्रप्रिय असावा लागतो, तो हा अर्थसंकल्प आहे, असे मुनगंटीवार म्हणाले.

पायाभूत सुविधांना प्राधान्य - गडकरी

अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांना प्राधान्य दिलं आहे अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. ते म्हणाले की, जागतिक दर्जाचे रस्ते तयार करण्यात येणार आहेत, तसेच बजेटमध्ये प्रदुषणासंदर्भात विचार करण्यात आला आहे. मध्यमवर्गासंदर्भात पहिल्यांदा विचार करण्यात आला आहे असे देखील गडकरी म्हणाले.

BJP leaders including Sudhir Mungantiwar praised the budget
Budget 2023 : शिवसेना खासदारांना आकडे किती कळताहेत ते...; देवेंद्र फडणवीसांचा नेमका 'नेम' कुणावर?

भविष्याचा वेध घेणारा अर्थसंकल्प - चंद्रशेखर बावनकुळे

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, या अर्थसंकल्पातून स्वातंत्र्याच्या शताब्दीतील भारताची भक्कम पायाभरणी अधोरेखित झाली आहे. या अर्थसंकल्पात आदिवासी, शेतकरी, मध्यमवर्ग, युवा, महिला, उद्योजकांपासूनपासून समाजातील सर्व वर्गाच्या विकासाचा विचार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्णत्वाकडे नेणारा हा अर्थसंकल्प आहे, असेही ते म्हणाले.

सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प - उदय सामंत

शेतकऱ्यांना आणि सर्व सामान्यांना दिलासा देणारा असा हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प आहे अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. ते म्हणाले की, पायाभूत सुविधा, उद्योग, बेरोजगारी, हरित क्रांतीच्या दृष्टीने हा महत्वाचा अर्थ संकल्प आहे. कोविड काळानंतर हा पहिला अर्थ संकल्प हा भावनिक देखील आहे. सर्व सामान्यांना आता ३ लाखापर्यंत उत्पनावर कर लागणार नाही. सर्व घटकांचा विचार करून हा अर्थ संकल्प सादर करण्यात आला आहे.

BJP leaders including Sudhir Mungantiwar praised the budget
New Income Tax Slab : ५ - १० की १५ लाख कमावता? नव्या कररचनेनंतर किती भरावा लागेल टॅक्स? जाणून घ्या!

सर्वसमावेशक अर्थसंकल्प - शंभूराजे देसाई

ग्रामीण शहरी भागातील लोकांना जोडणारा हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प आहे अशी प्रतिक्रिया शंभूराजे देसाई यांनी दिली आहे. पायाभूत सुविधांसाठी मोठी तरतुद करण्यात आली आहे. ५० वर्षे कर्ज व्याजरहीत करण्यात आली, त्यामुळे विकास कामे जलद गतीने होतील. टॅक्स स्लॅब बदलल्याने जनतेच्या हितासाठी अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न केले जातील. साखर कारखान्यांच्या बळकटी मिळेल असे शंभूराज देसाई म्हणाले.

मोदीजींनी ४० वर्षांचा प्रश्न सोडवला - हर्षवर्धन पाटील

हर्षवर्धन पाटील म्हणाले, मोदीजींनी ४० वर्षांच्या इन्कमटॅक्सचा प्रश्न सोडवला. अमित शाह यांच्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळाला. शेतकर्यांना आता त्यांच्या हक्काचा पैसा दिला जाईल. राज्याला जवळपास १० हजार कोटी रूपयांचा थेट फायदा होणार आहे. निर्णय घ्यायला राजकीय ईच्छाशक्ती आणि धाडस लागते, ते मोदी सरकारमध्ये आहे, असे हर्षवर्धन पाटील म्हणाले.

BJP leaders including Sudhir Mungantiwar praised the budget
Budget 2023 : शिवसेना खासदारांना आकडे किती कळताहेत ते...; देवेंद्र फडणवीसांचा नेमका 'नेम' कुणावर?

सर्वांना दिलासा देणारा अर्थसंकल्प -राहुल शेवाळे

प्रत्येक गटाला दिलासा देणारा हा अर्थसंकल्प आहे अशी प्रतिक्रिया खासदार राहुल शेवाळे यांनी दिली आहे. विरोधी पक्षांन बजेट नीट वाचलं नसेल, मुंबईच्या एमएससीबीला जी मदत मिळणार आहे ती मुंबईतल्या नागरिकांना मिळणार आहे. मुंबई शहरातून सर्वात जास्त टॅक्स भरला जातो त्यामुळे टॅक्सच्या सवलती मुंबईकरांना मिळणार आहेत, असे ते म्हणाले.

आत्मनिर्भर भारताचं बजेट - डॉ भारती पवार

अर्थसंकल्पात आदिवासी क्षेत्रासाठी १५ हजार कोटीचं बजेट दिलं आहे, त्यातुन पाणी, रस्ते या बांधले जातील. महिलांच्या ठेवीवर व्याज दरात वाढ करण्यात आली आहे. स्टार्टअपसाठी निधीची तरतुद करण्यात आली आहे. तसेच १५७ नर्सिंग कॉलेज उभारण्यात येणार आहेत, त्यामुळे हे आत्मनिर्भर भारताचं बजेट आहे असे डॉ भारती पवार म्हणाल्या.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com