Latur Crime News : 60 वर्षांपूर्वी म्हैस आणि वासराची चोरी; वयाच्या 78व्या चोर अटकेत, डोकं चक्रावणारं प्रकरण आलं समोर

Buffalo Theft News : गणपती वागोरे याने २५ एप्रिल १९६५ रोजी ही चोरी केली होती.
crime news
crime newsSaam Tv

Crime News :

कानून के हात लंबे होते है, असं म्हणतात. लातूर जिल्ह्यातील उदगीरमध्ये याची प्रचिती आली आहे. एका ७८ वर्षीय व्यक्ती ६० वर्षांपूर्वी केलेल्या चोरीच्या घटनेत अटक करण्यात आली आहे. गणपती विठ्ठल वागोरे असं या वृद्ध व्यक्तीचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गणपती वागोरे याच्यावर चोरीचा आरोप आहे. १९६५ मध्ये २० वर्षाचा असतानाचा चोरी केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. कर्नाटकातील बीदर येथील मेहकर गावातून दोन म्हशी आणि एका वासराच्या चोरीचा आरोप त्याच्यावर होता.  (Latest Marathi News)

crime news
Maharashtra Political News : अजित पवार गटाचं X अकाउंट सस्पेंड का झालं?; राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचं कनेक्शन उघड

गणपती याने २५ एप्रिल १९६५ रोजी ही चोरी केली होती. बिदर जिल्ह्यातील भालकी तालुक्यातील मेहकर गावात ही चोरी झाली होती. वागोरे याने कृष्ण चंदर याच्या सोबतीने ही चोरी केली होती. (Crime News)

पोलिसांच्या माहितीनुसार, हे प्रकरण खूप जुने आहे. कर्नाटकातील बीदर जिल्हा हा महाराष्ट्राच्या सीमेलगत आहे. टाकळगाव गावात राहणाऱ्या गणपती याने ही चोरी केली होती. कृष्ण चंदर सहआरोपी होता जो १९६५मध्ये ३० वर्षांचा होता. त्याचं २००६ मध्ये त्यांचे निधन झाले.

crime news
Vietnam Fire : भयंकर ! व्हिएतनामध्ये इमारतीला भीषण आग, ५० रहिवाशांचा होरपळून मृत्यू

बिदर पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, चोरीचा आरोप असलेला गणपती वागोरे अनेक वर्षांपासून अटकेपासून दूर होता. मात्र आता त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले आहेत. चोरीच्या प्रकरणात जामिनावर सुटल्यावर तो फरार झाला होता. गेल्या अनेक वर्षांपासून पोलीस त्याचा शोध घेत होते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com