Sanjay Biyani: संजय बियाणी वारसदार प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट, 'त्या' महिलेने...

संजय बियाणी वारसदार प्रकरणात नवा ट्विस्ट आला असून, पुन्हा वाद पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Sanjay Biyani: संजय बियाणी वारसदार प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट, 'त्या' महिलेने...
Sanjay Biyani Case New Twist Latest UpdateSAAM TV

नांदेड: प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी (Sanjay Biyani) यांच्या हत्याप्रकरणानंतर आता त्यांच्या वारसदार प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. संजय बियाणी यांच्या पत्नी अनिता बियाणी यांनी वारसदार म्हणून कोर्टात दावा केला असतानाच, अन्य एका महिलेनेही कोर्टात धाव घेऊन दावा केला आहे.

बियाणी यांची वारसदार ही पाच वर्षांची मुलगी असल्याचे तिचे म्हणणे आहे. त्यामुळे खरा वारसदार कोण यावरून पुन्हा वाद वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Sanjay Biyani Latest Update)

Sanjay Biyani Case New Twist Latest Update
नांदेड पोलिसांची मोठी कामगिरी; बियाणी हत्येतील मास्टरमाइंड ताब्यात

संजय बियाणी (Sanjay Biyani Case) यांची काही दिवसांपूर्वीच हत्या झाली होती. त्यांच्यावर दिवसाढवळ्या गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या प्रकरणातील आरोपींच्या अटकेचे सत्र सुरूच आहे. यापूर्वी तिघांवर मोक्का लावण्यात आला होता. तर याआधी नऊ जणांना अटकही केली होती.

तीन-चार दिवसांपूर्वीच या प्रकरणात पोलिसांनी दोघांना मध्य प्रदेशातून ताब्यात घेतले होते. तर दोन दिवसांपूर्वीच नांदेडमधील (Nanded) पौर्णिमानगरातून एकाला अटक केली होती. या आरोपीने बियाणींच्या घरावर पाळत ठेवली होती, तर मारेकऱ्यांना शस्त्रे पुरवल्याचा आरोप आहे.

संजय बियाणी हत्या प्रकरणानं राज्यभरात खळबळ उडाली होती. यानंतर त्यांचा खरा वारसदार कोण यावरूनही चर्चा झाली होती. बियाणी यांच्या पत्नी अनिता यांनी वारसदार असल्याचा दावा कोर्टात केला होता. हा संपत्तीचा वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

या वारसदार प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. बियाणींच्या पत्नी व्यतिरिक्त आणखी एका महिलेने पाच वर्षांची मुलगी खरी वारसदार असल्याचा दावा केला आहे. तिने कोर्टात धाव घेतली आहे.

Sanjay Biyani Case New Twist Latest Update
Sanjay Biyani: माझ्या पतीच्या खूनाचा तपास CBI ला साेपवा : अनिता बियाणी

बियाणी यांची वारसदार ही पाच वर्षांची मुलगी असल्याचा दावा या महिलेने कोर्टात केला आहे. नांदेड कोर्टात (Court) या प्रकरणी सुनावणी घेण्यात आली. मात्र, वारसदार म्हणून दावा करणाऱ्या महिलेचे वकील कोर्टात हजर नव्हते. त्यामुळे कोर्टाने वारसदाराच्या बाबतीत पुरावे सादर करावेत यासाठी पुढील सुनावणी २४ जून रोजी ठेवली. आधी पत्नीने वारसदार म्हणून दावा केलेला असतानाच, अन्य महिलेने तिची पाच वर्षांची मुलगी खरी वारसदार असल्याचा दावा थेट कोर्टात केल्याने या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे.

Edited by - Nandkumar Joshi

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com