Accident: खामगावजवळ तीन वाहनांचा विचित्र अपघात, उभ्या ट्रेलरवर ट्रक आदळला, दोन जण गंभीर जखमी

एकूण तीन मोठ्या ट्रक मध्ये झालेल्या अपघातातात दोन जण गंभीर जखमी झाले असून वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
Buldana Accident
Buldana Accident Saam Tv

बुलडाणा: बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव शहराजवळील घाटपुरी भागात एका ट्रकने समोर चाललेल्या दुसऱ्या ट्रेकला धडक दिली. यानंतर समोरील ट्रक अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या एका ट्रेलरला धडक दिली. एकूण तीन मोठ्या ट्रक मध्ये झालेल्या अपघातातात दोन जण गंभीर जखमी झाले असून वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे (Buldana 3 truck accident near Khamgaon two Injured).

Buldana Accident
पुणे मुंबई महामार्गावर कंटेनरचा भीषण अपघात; दृश्य CCTVमध्ये कैद!

कसा झाला अपघात?

खामगावजवळ (Khamgaon) मुंबई-नागपूर या राष्ट्रीय महामार्गावरून दोन ट्रक (Truck) मुंबईकडून नागपूरकडे जात असताना महामार्ग क्रमांक सहावर एका ट्रकने समोर चालणाऱ्या एका ट्रकला मागून जोरदार धडक दिली. यानंतर सदर ट्रकने रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या ट्रेलरला धडक दिली.

Buldana Accident
Aurangabad : औरंगाबादमध्ये वऱ्हाडाच्या वाहना अपघात, तिघांचा मृत्यू 22 जण जखमी,पाहा व्हिडीओ

स्पीड ब्रेकरजवळ ट्रक चालकाचे नियंत्रन सुटल्याने हा अपघात (Accident) घडला. यातील एक ट्रक एका नागरिकाच्या अंगणात जाऊन धडकला. सुदैवाने यात कुणाहाली इजा झाली नाही. मात्र, मागून धडक देणाऱ्या ट्रकमधील दोघेजण गंभीर जखमी (Injured) झाले आहे.

या ट्रकमधील चालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. जखमींना जवळच्या सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com