Shivsena : बाप कधीही चोरता येत नसतो; उद्धव ठाकरेंच्या टीकेला शिंदे गटातील आमदाराचं प्रत्युत्तर

उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला आमदार संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
Uddhav thackeray
Uddhav thackeray saam tv

बुलडाणा : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गोरेगाव येथील शिवसेना (Shivsena) गटप्रमुखांच्या सभेला संबोधित करताना शिंदे गटावर जोरदार टीका केली होती. आतापर्यंत मुलं पळवणारी टोळी ऐकली होती, मात्र बाप चोरणारी टोळी पहिल्यांदाच ऐकतो आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर निशाणा साधला होता. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी केलेल्या या टीकेला संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. (Buldhana News Today)

Uddhav thackeray
एनआयएची PFI वर छापेमारी; प्रकाश आंबेडकर म्हणतात पुरावे द्या, अन्यथा...

'बाळासाहेब ठाकरे हे महापुरुष आहेत आणि महापुरुष हे कुणा एकट्याचे नसून ते देशाचे असतात. अशा महापुरुषांचा आदर्श जोपासून त्यावर मार्गक्रमण करणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे बाप कधीही चोरता येत नसतो हे सर्वांनी लक्षात ठेवावं', असं म्हणत बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत दोन गट पडले. खरी शिवसेना आमचीच असा दावा दोन्ही गटांकडून केला जात आहे. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर टीकेचा भडीमार देखील करत आहे. ऐकेकाळी बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड उद्धव ठाकरे यांच्याबद्दल ब्र ऐकून घेत नव्हते. मात्र, शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरच निशाणा साधला आहे.

तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना ते आमदार गायकवाड यांच्या कानात काहीतरी बोलताना चा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी आमदार गायकवाड यांना काय सल्ला दिला असेल यावरून अनेक तर्कवितर्क लढविण्यात येत होते, मात्र त्यालाही आमदार गायकवाड यांनी पूर्णविराम दिलाय.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com