शिवसेना खासदार प्रतापराव जाधवांची भावानेच सोडली साथ; ठाकरेंसोबत राहण्याचा निर्धार

बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांचे धाकटे भाऊ व मेहकरचे माजी नगराध्यक्ष व गटनेता संजय जाधव यांनी आपल्या खासदार भावाची साथ सोडली आहे.
Buldana Shivsena News
Buldana Shivsena NewsSaam TV

बुलडाणा: बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव (Prataprav Jadhav) यांचे धाकटे भाऊ व मेहकरचे माजी नगराध्यक्ष व गटनेता संजय जाधव यांनी आपल्या खासदार भावाची साथ सोडली आहे. संजय जाधव हे अजूनही मूळ शिवसेनेतच (Shivsena) असल्याने आता जिल्ह्यात राजकीय चर्चाना उधाण आलं आहे.

खासदार प्रतापराव जाधव ठाकरेंची साथ सोडत शिंदे (Eknath Shinde) गटात प्रवेश केला आहे. मात्र, आता जाधव कुटुंबात राजकीय फूट पडल्याचं दिसत आहे. कारण प्रतापरावांचे भावानेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत (Uddhav Thackeray) राहण्याचा निर्धार केला आहे. खासदाराच्या कुटुंबातच फूट पडल्यामुळे झाल्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात हादरे बसले आहेत.

पाहा व्हिडीओ -

संजय जाधव हे प्रतापरावांचे सख्खे धाकटे बंधू असून ते उद्धव ठाकरेंच्याच शिवसेनेत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. काल उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त वर्तमानपत्रातून दिलेल्या जाहिरातीत सुद्धा त्यांनी पक्षप्रमुख असा उल्लेख केला असून जिल्ह्यातील शिवसेनाच्या इतर नेत्यांसोबत त्यांचे जाहिरातीत फोटोही आहेत.

तसेच मेहेकर येथे बॅनर सुद्धा लावले गेले आहेत. संजय जाधव यांनी ही माहिती फोनवरून दिली असून बाळासाहेब माझं दैवत असून उद्धवसाहेब हे माझे नेते असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान, ठाकरे यांच्या आदेशानुसार जिल्हा शिवेसना संपर्कप्रमुख पदावरून प्रतापराव जाधव यांची हकालपट्टी करण्यात आली होती, मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा प्रतापराव जाधव यांची बुलडाणा जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुखपदी नियुक्ती केली आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com