बुलढाण्यातही वाजली शाळेची घंटा; बिरसिंगपुर येथील शाळा सुरु

बुलडाणा जिल्ह्यात एकुन 2435 शाळा असुन यामध्ये जिल्हापरिषदेच्या 1438 शाळा आहेत.
बुलढाण्यातही वाजली शाळेची घंटा; बिरसिंगपुर येथील शाळा सुरु
बुलढाण्यातही वाजली शाळेची घंटा; बिरसिंगपुर येथील शाळा सुरुसंजय जाधव

बुलढाणा: कोविड-19 मुक्त (Covid-19) गावांत पहिल्या टप्प्यात आज आजपासून इयत्ता आठवी ते बारावी पर्यतच्या शाळेची घंटा वाजली तब्बल दीड वर्षानंतर विद्यार्थ्यांना शाळेत येता आलं त्यामुळे विदयार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला आहे.

बुलडाणा जिल्ह्यात एकुन 2435 शाळा असुन यामध्ये जिल्हापरिषदेच्या 1438 शाळा आहेत. ज्या गावांमध्ये मागील एक महिन्यापासून कोरोणाचा एकही रुग्ण नाही अशा गावात शाळा आज पासून शाळा सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.

बुलढाणा शहरानजीकच्या बिरसिंगपुर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आज आठवीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. यावेळी प्रवेशोत्सव कार्यक्रम घेण्यात आला विद्यार्थ्यांचे स्वागत जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापती कमलताई बुधवत यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आलं यावेळी. शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे मास्क, सॅनिटायझर वर विशेष लक्ष देण्यात आले. विद्यार्थ्यांच्या बसण्याची व्यवस्था सामाजिक अंतर राखूनच करण्यात आली होती आज शाळेमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांच शिक्षकांनी आवारात गुलाब पुष्प देवून व पुस्तके देऊन स्वागत केले.

Edited By: Pravin Dhamale

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com