Buldhana : आरोग्य विभागात 30 नवीन ॲम्बुलन्स रुग्णसेवेसाठी दाखल

बुलढाणा जिल्ह्यात 30 सुसज्ज अशा रुग्णवाहिका जिल्हा आरोग्य विभागात दाखल झाल्या आहेत. पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी हिरवा झेंडा दाखवून या सर्व रुग्णवाहिकांचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात लोकार्पण केले.
Buldhana : आरोग्य विभागात 30 नवीन ॲम्बुलन्स रुग्णसेवेसाठी दाखल
Buldhana : आरोग्य विभागात 30 नवीन ॲम्बुलन्स रुग्णसेवेसाठी दाखलसंजय जाधव

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा असून सक्षम करण्यासाठी आणि गाव खेड्यातून रुग्णांना प्रमुख रुग्णालयापर्यंत पोहोचवण्यासाठी रुग्णवाहिकेची मोठ्या प्रमाणात कमतरता भासत होती, त्यामुळे जिल्हा आरोग्य विभागाने शासनाकडे 50 नवीन रुग्णवाहिकेची मागणी केली होती.

हे देखील पहा :

त्यानुसार आज बुलढाणा जिल्ह्यात 30 सुसज्ज अशा रुग्णवाहिका जिल्हा आरोग्य विभागात दाखल झाल्या आहेत. पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी हिरवा झेंडा दाखवून या सर्व रुग्णवाहिकांचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात लोकार्पण केले. यावेळी खासदार प्रतापराव जाधव, आमदार राजेश इकडे, जिल्हा परिषद अध्यक्षा मनिषा पवार यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

Buldhana : आरोग्य विभागात 30 नवीन ॲम्बुलन्स रुग्णसेवेसाठी दाखल
गोयल यांचे एकरकमी FRPचे पत्र म्हणजे सरकारचा निर्णय नव्हे, स्वाभिमानी ची भूमिका!

रुग्णवाहिकेचे लोकार्पण होत असताना डॉक्टर राजेंद्र शिंगणे आणि खासदार प्रतापराव जाधव यांनी सारथी होऊन रुग्णवाहिका चालवली. तर, जिल्हा परिषद अध्यक्षा मनिषा पवार यांना देखील या ॲम्बुलन्स चे सारथ्य केले. प्राप्त झालेल्या या 30 रुग्णवाहिका जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये या ठिकाणी रवाना झाल्या आहेत. तर, अजूनही 20 नवीन रुग्णवाहिका ह्या जिल्हा आरोग्य विभागात लवकरच दाखल होणार आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.