बुलडाण्यातील चिमुकल्याच्या टॅलेंटची कमाल; थेट 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'नं घेतली दखल

वयाच्या दीड वर्षीच आरोहने नेमकी कोणती कामगिरी केली असा प्रश्न तुम्हाला पडला असेल
Buldhana Aaroh Patil
Buldhana Aaroh PatilSaam Tv

संजय जाधव, साम टीव्ही

बुलडाणा : ज्या वयात अगदीच व्यवस्थित बोलता येत नाही , उभंही राहता येत नाही. अशा वयात बुलडाणा (Buldhana) जिल्ह्यातील चिमुकल्याने चमकदार कामगिरी केली आहे. फक्त दीड वर्ष वय असलेल्या आरोह पाटील या चिमुकल्याने इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये (India Book Of Records) आपलं नाव नोंदवलं आहे. इतकंच नाही तर, आरोह हा देशातील सर्वात कमी वयात या पुरस्काराचा मानकरीही ठरला आहे. (Buldhana Latest Marathi News)

Buldhana Aaroh Patil
जेवल्यानंतर ही कामे लगेच करु नका

बुलडाणा शहरातील गणेशनगर परिसरात राहणाऱ्या सुरज पाटील यांचा मुलगा आरोह पाटील याने अवघ्या दीड वर्ष वय असताना इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये सुवर्णपदक मिळवून स्थान पटकावलं आहे. वयाच्या दीड वर्षीच आरोहने नेमकी कोणती कामगिरी केली असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर आरोह हा चिमुकला कोणत्याही कार्डवरील नावं पटकन सांगतो.

आरोह अगदी तीन महिन्यांचा असताना त्याच्या आईनं त्याला फ्लॅश कार्डची ओळख करुन दिली. पण आता आरोह कोणत्याही कार्डावरील नाव अगदी सहज सांगतो. आरोहच्या आई-वडिलांनी त्याचे व्हिडीओ तयार करुन 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स'ला पाठवले. 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स'नं आरोहची तात्काळ दखल घेतली. त्याचे व्हिडीओ पाहिले. आणि त्याला सुवर्ण पदक देऊन 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये स्थान दिलं. हा किताब पटकावणारा आरोह भारतातील सर्वात कमी लहान मुलगा आहे.

"मुलांना मोबाईल पासून दूर ठेवा"

आरोहची आत्मसात करण्याची पावर खूप दांडगी आहे, त्याच सर्वत्र कौतुक होत आहे , आजच्या परिस्थितीत लहान लहान मुले मोबाईल युगात अडकले आहेत, त्यांच्या मनावर ताण वाढत आहे, दुर्घटना होत आहे वाईट वाटते, मी पालकांना सांगेन की, आपल्या पाल्याकडे काळजीने लक्ष द्या व मोबाईल पासून दूर ठेवा. असा संदेश सुद्धा आरोहचे वडील सूरज पाटील यांनी दिला आहे.

"आम्हाला सर्वांना आरोहचा अभिमान"

आरोह लहान असतानाच आम्ही त्याला फ्लॅश कार्ड दाखवून चित्राची ओळख करवून दिली, त्यात महापुरुष, जनरल अस काही सर्वकाही आता तो सहज पणे पटापट सांगतो आहे, त्याने इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये स्थान मिळविल्याने आम्हा सर्वांना त्याचा खूप अभिमान वाटतो आहे. अशी प्रतिक्रिया आरोहच्या आईने दिली आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com