भरधाव ट्रकची मोटारसायकलला धडक; एकाच घरातील तिघांचा मृत्‍यू

भरधाव ट्रकची मोटारसायकलला धडक; एकाच घरातील तिघांचा मृत्‍यू
भरधाव ट्रकची मोटारसायकलला धडक; एकाच घरातील तिघांचा मृत्‍यू
Accident Saam tv

बुलढाणा : बुलढाणा– अजिंठा या राष्ट्रीय महामार्गवरील भरधाव ट्रकने मोटारसायकला जोरदार धडक दिली. यात तीन जणांचा जागीच मृत्‍यू (Death) झाला. तर अन्‍य एक गंभीर जखमी आहे. (buldhana accident news truck hits motorcycle Death of three on the spot)

Accident
जळगावात ५४ रूपये पेट्रोल; मनसेचा उपक्रम पंधरा मिनिटाच संपला

बुलढाणा– अजिंठा या राष्ट्रीय महामार्गवरील मढ फाट्याजवळ असलेल्या महानुभाव आश्रमसमोर आज दुपारच्या सुमारास गिट्टी घेऊन जाणाऱ्या भरधाव टिप्परने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक (Accident) दिली. या धडकेत दुचाकीवरील 40 वर्षीय व्यक्ती जागीच ठार झाला. तर दोन मुले व 35 वर्षीय महिलेला गंभीर अवस्थेत बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी दोन्ही मुलांना मृत घोषित केले आहे.

महिला गंभीर जखमी

दुचाकीवर जात असलेल्‍या चार जणांपैकी पती, पत्नी, मुलगा व त्यांचा एक नातेवाईक मुलगा हे मढकडून औरंगाबाद जिल्ह्यातील पानवडोद या गावाकडे जात होते. यावेळी हा अपघात झाला. अपघातातील महिला गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे त्यांना अकोला रेफर करण्यात आले आहे

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com