बुलढाण्यात फोटोशुट करून परतणाऱ्या दोन युवकांवर काळाचा घाला !

सदर अपघाताची घटना सीसीटिव्हीमध्ये कैद झाली असून या दोन युवकांच्या अपघाती मृत्यमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
बुलढाण्यात फोटोशुट करून परतणाऱ्या दोन युवकांवर काळाचा घाला !
बुलढाण्यात फोटोशुट करून परतणाऱ्या दोन युवकांवर काळाचा घाला !संजय जाधव

बुलढाणा : बुलढाण्यातील चिखली येथे एमआयडीसी परिसरात फोटोशुट करून चिखलीकडे परत येत असताना झालेल्या अपघातात 1 युवकाचा जागीच तर दुसऱ्याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रेणुका पेट्रोलपंपासमोर घडली आहे.

शेख दानिश बिबन उर्फ मोनु (18), फिरोज सलीम खान (17) व सातगांव भुसारी येथील रोहित प्रदीप कंकाळ (19) हे तिघेजण पल्सर वाहन क्र.एम.एच.20, सी.एफ.0993 ने चिखलीतील एमआयडीसी परिसरात फोटोशुट करण्याकरिता गेले होते.

हे देखील पहा -

फोटोशूट करून हे तिघे मित्र चिखलीकडे परत येत असताना चिखली-देऊळगावराजा महामार्गावरीवरील स्थानिक रेणुका पेट्रोल पंपासमोर रस्ता ओलांडणाऱ्या जे.सी.बी. मशीन ला दुचाकीची जबर धडक बसली. यामध्ये दुचाकीचालक शेख दानिश बिबन उर्फ मोनू रा.हिदायत नगर माळीपुरा, चिखली याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर याच भागातील रहिवासी फिरोज खान सलीम खान (१७) हा देखील औरंगाबाद येथे उपचारादरम्यान मृत्यू पावला आहे.

बुलढाण्यात फोटोशुट करून परतणाऱ्या दोन युवकांवर काळाचा घाला !
नांदेड जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन

तर रोहित प्रदीप कंकाळ राहणार सातगाव भुसारी हा किरकोळ जखमी झाला असून त्याच्यवर येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर अपघाताची घटना सीसीटिव्हीमध्ये कैद झाली या २ युवकांच्या अपघाती मृत्यमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या अपघातानंतर चिखली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com