सावकरांवरून वाद पेटला; चिखलीत मनसे आक्रमक, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई पोलिसांच्या ताब्यात

पोलिसांनी मनसे नेते संदीप देशपांडे आणि नितीन सरदेसाई यांना ताब्यात घेतलं.
Buldhana MNS News
Buldhana MNS NewsSaam Tv

बुलडाणा : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात केलेल्या विधानामुळे मनसे आक्रमक झाली आहे. राहुल गांधी यांचा निषेध म्हणून त्यांची भारत जोडो यात्रा रोखण्यासाठी मनसैनिक बुलडाण्याच्या दिशेने रवाना झाले. मात्र, चिखलीत त्यांना पोलिसांनी रोखलं आहे. पोलिसांनी मनसे नेते संदीप देशपांडे आणि नितीन सरदेसाई यांना ताब्यात घेतलं. तसेच इतर मनसैनिकांची धरपकड केली आहे. (Maharashtra News)

Buldhana MNS News
Breaking News : सचिन वाझेंना मुंबई सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर; पण सुटका नाहीच, कारण...

काँग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी हे भारत जोडो यात्रेदरम्यान, महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यादरम्यान, त्यांनी भाषण करताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात विधान केलं. राहुल गांधी यांच्या विधानानंतर मनसेने त्यांची शेगावमधील सभा उधळण्याचा इशारा दिला होता. त्यासाठी आज महाराष्ट्रभरातून मनसैनिक शेगावच्या दिशेने रवाना झाले.

वारंवार सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसला धडा शिकवणार असल्याचं मनसेने (MNS) म्हटलं आहे. दरम्यान, मोठ्या संख्येने मनसे कार्यकर्ते बुलडाण्याच्या दिशेने निघाले असता, पोलिसांनी त्यांना चिखली नाक्यावरच रोखलं. यानंतर त्या ठिकाणीच मनसे नेते आणि कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं.

Buldhana MNS News
Rahul Gandhi Vs BJP : राहुल गांधींनी महाराष्ट्र आणि मराठी माणसाचा अपमान केला: भाजप

यावेळी मनसैनिकांनी राहुल गांधींविरोधात जोरदार घोषणाबाजीही सुरू केली. दरम्यान पोलिसांनी मनसे नेते संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई, दिलीप बापू धोत्रे यांच्यासह काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. मनसैनिकांच्या घोषणांमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

'आज लोकशाहीची दडपशाही झाली. काँग्रेसवाले घाबरले म्हणून त्यांनी पोलिसांना मध्ये आणलं. काँग्रेस का घाबरली आहे, कुठल्या गोष्टीला राहुल गांधी घाबरले आहेत?, जोपर्यंत आम्हाला शेगावला जाण्याची परवानगी देत नाहीत किंवा त्यांना काय आदेश देण्यात आला आहे, हे दाखवत नाहीत. तोपर्यंत आमचं हे ठिय्या आंदोलन सुरू राहणार'. असं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितलं आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com