जामीन मंजूर हाेताच 'स्वाभिमानी' चे नेते रविकांत तुपकर कडाडले

आम्ही शेतक-यांसाठी लढा सुरुच ठेवणार असल्याचे तुपकरांनी नमूद केले.
ravikant tupkar
ravikant tupkar

बुलढाणा : कापूस आणि सोयाबीनच्या दरवाढीसाठी अन्नत्याग आंदोलन करणा-या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रवीकांत तुपकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची प्रशासनाने दखल न घेतल्याने बुलढाणा जिल्ह्यात काही दिवसांपुर्वी आंदाेलनास हिंसक वळण लागले हाेते. त्याचा ठपका ठेवत आज (मंगळवार) सकाळी पाेलिसांनी तुपकर व त्यांच्या पत्नी शर्वरी यांच्यासह कार्यकर्त्यांना अटक केली हाेती. दरम्यान दुपारी न्यायालयाने सर्वांची जामीनावर मुक्तता केली आहे. हा सत्याचा विजय झाल्याची भावना तुपकर यांनी जामीन मंजूर झाल्यानंतर व्यक्त केली.

ravikant tupkar
काेल्हापूरात नुसती पळापळ; मास्क नसल्यास काढाव्या लागतात उठाबशा

तुपकर व सहका-यांना पाेलिसांनी कनिष्ठ न्यायालयात हजर केले. न्यायाधीशांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर संशयितांना प्रत्येकी २० हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला. दरम्यान जामीन देताना रवीकांत तुपकर आणि इतरांना पाेलिसांना तपासात सहकार्य करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

आजची सुनावणी सुरु असताना न्यायालयाच्या परिसरात शेकडाे शेतकरी व कार्यकर्ते यांची गर्दी हाेती. आमच्यावर हेतुपरस्पर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जाणूनबुजून अडकाविण्याचा प्रयत्न केला गेला आहे. कितीही गुन्हे दाखल करा आम्ही शेतक-यांसाठी लढा सुरुच ठेवणार असल्याचा इशारा तुपकरांनी राज्य सरकारला दिला आहे.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com