Buldhana News: धक्कादायक! राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शहराध्यक्षवर प्राणघातक हल्ला; हल्लेखोरास अटक

Buldhana News Update: हल्ल्यावेळी अनिल बावस्कर सावध असल्याने मोठा अनर्थ टळला असून एका हल्लेखोरास पकडण्यात यश आले आहे.
Buldhana News
Buldhana NewsSaamtv

संजय जाधव, प्रतिनिधी...

Buldhana Crime News: बुलढाणा शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बुलढाण्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे शहराध्यक्ष अनिल बावस्कर यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. हल्ल्यावेळी अनिल बावस्कर सावध असल्याने मोठा अनर्थ टळला असून एका हल्लेखोरास पकडण्यात यश आले आहे. (Crime News In Marathi)

Buldhana News
Gondia Fraud: फेसबुकवर मैत्री जमली.. परदेशातून 'बर्थडे गिफ्ट' पाठवण्याचे आमिष अन् गोंदियातील शिक्षिकेला १२ लाखाचा गंडा

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अनिल बावस्कर यांची शहरातील (Buldhana) जयस्तंभ चौकात इडली-डोसाची हातगाडी आहे. रात्री नऊ वाजताच्या सुमारास तोंड बांधून आलेल्या तिघांनी त्यांच्या त्यांच्या डोक्यात लोखंडी रॉड टाकण्याचा प्रयत्न केला. पण बावस्कर सावध असल्यामुळे बचावले. त्यांनी वरच्यावर रॉड पकडून हल्लेखोरास जोरदार लाथ मारली.

तोपर्यंत आजूबाजूचे व्यावसायिक बावस्कर यांच्या मदतीला धावले. या हल्लेखोराला पकडून त्याला चोप देण्यात आला. मात्र त्याचे दोन साथीदार पळून जाण्यात यशस्वी राहिले. सदर हल्लेखोराला पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. हा हल्लेखोर जालना येथील असल्याचे समजते.

Buldhana News
Earthquake Video: मोरोक्कोमध्ये सर्वात मोठा भूकंप, आतापर्यंत २९६ जणांचा मृत्यू; शेकडो इमारती कोसळल्या, पाहा VIDEO

या हल्ल्याची माहिती मिळताच शहर पोलीस स्टेशनमध्ये राष्ट्रवादीचे नेते नरेश शेळके, काँग्रेसचे शहराध्यक्ष दत्ता काकस तसेच जाकीर कुरेशी, सत्तार कुरेशी सह अनेक सामाजिक कार्यकर्ते दाखल झाले होते. या प्रकरणात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. बावस्कर एक प्रामाणिक व्यावसायिक असून सक्रिय पदाधिकारी आहेत. सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असलेल्या बावस्करांवर हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध होत आहे. (Latest Marathi News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com