
संजय जाधव, साम टीव्ही
Buldhana Paper Leak Case : बुलढाणा बारावी पेपर फुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. पेपरफुटी प्रकरणी SIT तपासात मुख्य आरोपी निश्चित करण्यात आला आहे. लोणार इथून पकडलेला अकील हाच मुख्य आरोपी आहे. अकील मुनाफ हा पेशानं शिक्षक आहे. परीक्षा केंद्रावर पेपर सुरु होण्याआधीच त्याने पेपरचे फोटो काढले होते आणि व्हायरल केले होते. (Latest Marathi News)
बुलडाण्यातील (Buldhana)बारावी पेपरफुटी प्रकरणाचा घोटाळा सर्वात आधी साम टीव्हीने उघड केला होता. त्यानंतर प्रशासनाने यावर कडक पाऊलं उचलत या प्रकरणाची कसून चौकशी करण्यासाठी SIT ची स्थापना केली होती. या प्रकरणात दोन शिक्षकांसह एकूण आठ जणांना अटक करण्यात आली होती.
याशिवाय परीक्षेत पास करून देण्यासाठी विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी 10 ते 12 हजार रुपये घेतले जात असल्याची, माहितीही समोर आली होती. याच एसआयटी चौकशीत अकील मुनाफच आरोपी असल्याचं निश्चित झालं आहे. अकील मुनाफ याने बारावीचा (HSC Exam) गणिताचा पेपर सुरू होण्याआधी आपल्या मोबाईल केमेरात पेपरचे फोटो काढून इतरांना पाठविल्याचं तपासात समोर आलं आहे.
दरम्यान, बुलढाणा पेपरफुटी प्रकरणात आठ पैकी तीन आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला आहे. तर उर्वरित पाच आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. या पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे नेमके कुठपर्यंत पोहचले आहे? याचा तपास सुरू आहे.
अहमदनगरमध्ये क्राईम ब्रांचची मोठी कारवाई
बारावी गणित पेपरफुटीप्रकरणी अहमदनगरच्या (Ahmednagar) मातोश्री भागूबाई भामरे विद्यालयातील मुख्याध्यापकांसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. मुंबई क्राईम ब्रान्चने ही कारवाई केली आहे. क्राईम ब्रान्चच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. 3 मार्चला बारावी गणिताचा पेपर महाविद्यालयातील विद्यार्थांना एक तास आधीच मिळाला होता.
शाळेचा निकाल 100 टक्के लागावा या उद्देशाने शाळेच्या व्यवस्थापनाने पेपर फोडला. परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका आल्यानंतर त्याचे छायाचित्र काढून व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पाठवून प्रत्येकी 10 हजार रुपये घेतल्याचे समोर आलं आहे. याचा तपास सध्या सुरू आहे.
Edited By - Satish Daud
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.