Buldhana News: मध्यरात्री घरात घुसले, पती-पत्नीचे हातपाय बांधले अन्... बुलढाण्यात ४ ठिकाणी सिनेस्टाईल दरोडा

Buldhana Crime News: लोणार पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या वडगाव तेजन गावात मंगळवारी रात्रीच्या सुमारास ४ वेगवेगळ्या ठिकाणी सशस्त्र दरोडा पडला आहे.
Buldhana Crime News Today
Buldhana Crime News TodaySaam TV

संजय जाधव, साम टीव्ही

Buldhana Crime News: बुलढाणा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लोणार पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या वडगाव तेजन गावात मंगळवारी रात्रीच्या सुमारास ४ वेगवेगळ्या ठिकाणी सशस्त्र दरोडा पडला आहे. (Latest Marathi News)

दरोडेखोरांनी चाकूचा तसेच हत्यारांचा धाक दाखवून लाखोंचा मुद्देमाल लंपास केलाय. एकाच दिवशी ४ ठिकाणी दरोडा पडल्याने गावात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच लोणार पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून दरोडेखोरांचा शोध घेतला जात आहे.

Buldhana Crime News Today
Petrol-Diesel Prices: कच्च्या तेलाचे भाव कडाडले, पेट्रोल-डिझेल दरात भडका उडण्याची भीती; आजचा भाव काय?

पालखी मार्ग शेगाव -पंढरपूर व सुलतानपुर महामार्गाच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या वडगाव तेजन (Buldhana News) येथे मध्यरात्रीच्या सुमारास दरोडेखोरांच्या टोळीने दहशद माजवली. ग्रामस्थ गाढ झोपेत असल्याचा फायदा घेत रस्त्यावर असलेल्या घरावर सशस्त्र हल्ला करीत दरोडेखोरांनी मध्यरात्री वयोवृद्ध शेतकरी रामकिसन रामराव तेजनकर यांच्या घरात प्रवेश केला.

दरोडेखोरांनी पती-पत्नीला (Crime News) बांधून ठेवत दोघांच्याही गळ्याला चाकू लावून घरातील दागिन्यांसह मुद्देमाल लंपास केला. दाम्पत्याच्या डोळ्यासमोरच दरोडेखोरांनी मुद्देमाल घेऊन पळ काढला. इतक्यावरच हे दरोडेखोर थांबले नाही. तर त्यांनी भारतीय सैन्य दलात कार्यरत असणाऱ्या नारायण तुकाराम कुलाल यांच्या घरी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तोडफोड करीत घरामधील मौल्यवान वस्तूंची चोरी केली.

Buldhana Crime News Today
Maharashtra Rain Updates: महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळणार; या जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD चा इशारा

याचदरम्यान, जुन्या (वडगाव तेजन) गावांमध्ये राहणाऱ्या विशाल रमेश तेजनकर व इंदुबाई त्रंबक मानवतकर यांच्या घरावर चोरांनी डल्ला मारून सोने व रोख रक्कम पसार केली. एकाच रात्री एकाचवेळी चोरट्यांनी सशस्त्र हत्यारांसह टाकलेल्या दरोडयात ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांणी लंपास केल्याची तक्रार रामकिसन रामराव तेजनकर वय ६९ यांनी लोणार पोलीस स्टेशनला दिली आहे.

त्याचप्रमाणे, विशाल रमेश तेजनकर यांच्या घरातील ३२ हजारांची रोख रक्कम अडीच ते तीन तोळे सोन्यावर चोरट्यांनी डल्ला मारला. तर इंदुबाई त्र्यंबक मानवतकर यांच्या घरातील २० हजार रुपयांची रोख रक्कम आणि मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. दरम्यान, या दरोड्याची माहिती मिळताच लोणार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मिनिश मेहेत्रे यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळाची पाहणी केली. पोलिसांकडून सध्या दरोडेखोरांचा शोध घेतला जात आहे.

Edited by - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com