Chikhali Marriage Fight: लग्नातील डीजेवरून वाद पेटला, चिखलीत दोन गटात तुफान हाणामारी; २५ ते ३० जणांविरोधात गुन्हा

Chikhali Marriage Fight News: लग्न म्हटलं की, गडबड गोंधळ आलाच. कधी डीजेच्या तालावर नाचण्यावरून वऱ्हाडी मंडळीत वाद होतो. तर कधी लग्नात न मिळालेल्या मानपानावरून.
Buldhana Chikhali Marriage Fight News
Buldhana Chikhali Marriage Fight NewsSaam TV

संजय जाधव, साम टीव्ही

Chikhali Marriage Fight News: लग्न म्हटलं की, गडबड गोंधळ आलाच. कधी डीजेच्या तालावर नाचण्यावरून वऱ्हाडी मंडळीत वाद होतो. तर कधी लग्नात न मिळालेल्या मानपानावरून. राज्यात सध्या लग्नसराईचा हंगाम जोमात सुरू आहे. लगीनसराईमुळे अनेकांची धावपळ होताना दिसून येतेय. तर काही ठिकाणी लग्नात वाद देखील होत आहे. (Breaking Marathi News)

अशीच एक घटना बुलढाणा (Buldhana News) जिल्ह्यातील चिखली तालुक्यातून समोर आली आहे. चिखली तालुक्यातील सैलानीनगर भागात लग्नामध्ये डीजेवर लावलेल्या गाण्यावरून दोन गटात वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, यातून दोन्ही गटात तुफान हाणामारी झाली.

Buldhana Chikhali Marriage Fight News
Crime News: लग्नानंतर नवरा नोकरीसाठी शहराबाहेर गेला; बायको पडली दिराच्या प्रेमात, त्यानंतर...

या घटनेत दोन्ही गटातील २० ते २५ जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. थरकाप उडवणारी ही घटना मंगळवारी (१६ मे) रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेनं परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र, पोलिसांनी (Police) वेळेवर घटनास्थळी धाव घेत वाद मिटवला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन्ही गटातील २५ ते ३० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी चिखली (Chikhali) साकेगाव मार्गावरील सैलानीनगर परिसरात एका लग्नाचा कार्यक्रम होता. यावेळी नवरदेवाकडील वऱ्हाडी मंडळी डीजेच्या तालावर थिरकत होते. अचानक एक विशिष्ट समाजातील व्यक्ती त्या ठिकाणी आले. डीजेवर गाणी वाजवण्यावरून त्यांनी वऱ्हाडी मंडळींसोबत हुज्जत घातली.

Buldhana Chikhali Marriage Fight News
Crime News: इथल्या महिलांसोबत घडतंय भयंकर; पोस्टानं पाठवली जाताहेत वापरलेले कंडोम, नेमकं काय आहे प्रकरण

यावेळी दोन्ही गटात शाब्दिक चकमक झाली. वाद इतका विकोपाला गेला, की विशिष्ट समाजाच्या लोकांनी लग्नातील वऱ्हाडी मंडळींना (Marriage Fight) लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेत दोन्ही गटातील २० ते २५ जण जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. (Latest Marathi News)

घटनास्थळी पोलिस दाखल झाल्याचे पाहून अनेकांनी पळ काढला. पोलिसांनी जखमी व्यक्तींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याप्रकरणी २० ते २५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण पसरलं होतं. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्या तणाव निवळला.

Edited by - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com